शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

सांगलीत १८ तास गव्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 2:27 PM

सांगली : मंगळवारी पहाटे सांगली शहरात घुसलेल्या गव्याला पकडण्याचे प्रयत्न अखेर १८ तासांनंतर यशस्वी ठरले. बुधवारी रात्री पावणेदोनच्या सुमारास ...

सांगली : मंगळवारी पहाटे सांगली शहरात घुसलेल्या गव्याला पकडण्याचे प्रयत्न अखेर १८ तासांनंतर यशस्वी ठरले. बुधवारी रात्री पावणेदोनच्या सुमारास तो वनविभागाच्या कंटेनरसारख्या वाहनात बंदिस्त झाला. सकाळी नऊच्या सुमारास त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यामुळे सांगलीकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.गेल्या तीन दिवसांपासून कसबे डिग्रज, सांगलीवाडी परिसरात गव्याचा वावर होता. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास त्याने सांगली शहरात प्रवेश केला. शहरातील मध्यवर्ती भागातील मार्केट यार्डात तो शिरला. प्रशासनाने लगेच हा परिसर पूर्ण बंद करून त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मार्केट यार्डातील एका गोदामाजवळचे तीन मार्ग बंद करून बोळाच्या तोंडावर खास मागविण्यात आलेला कंटेनर उभा करण्यात आला. तो इतर मार्गाने बाहेर पडणार नाही यासाठी तिन्ही मार्ग वाहने, पत्रे लावून बंद करण्यात आले होते.वनविभागाने कोल्हापूर व पुण्याहूनही पथक बोलावले. तीन दिवसांपासून फिरत असल्याने थकलेल्या गव्याला पाच ते सहा तास विश्रांती देण्यात आली. दुपारी तीननंतर पुन्हा त्यास वाहनात बंदिस्त करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली. त्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून मागविण्यात आलेल्या वाहनाचे रॅम्प जममिनीच्या पातळीवर लावण्यासह इतर तयारी करण्यास प्रशासनाला रात्रीचे नऊ वाजले.रात्री दहाच्या सुमारास पुन्हा दोन वाहने आत बोळात गेली. त्याला पुढे-पुढे आणत कंटेनरकडे आणण्याचा प्रयत्न झाले. मात्र, थकलेला गवा कंटेनरसमोरच बसत होता. त्यामुळे पुन्हा मोहीम थांबविण्यात आली. रात्री पाऊणच्या सुमारास पुन्हा वाहनांव्दारे त्यास पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आले. अखेर पावणे दोनच्या सुमारास तो कंटेनरमध्ये स्वत:हून चढला. रात्री तीन वाजता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. त्यास कोणतीही इजा झाली नसल्याचे दिसून आल्यानंतर कंटेनरमधून नेऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.तीस तासांचा थरारक प्रवास

बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता गव्याला सुरक्षितपणे अधिवासात सोडण्यात आले. यामुळे मंगळवारी पहाटे पाच ते बुधवारी सकाळी साडेनऊ असा तीस तासांचा थरार सांगलीकरांनी अनुभवला. वन विभागाचे उपवनसंरक्षक विजय माने, सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, अजितकुमार पाटील, अजित ऊर्फ पापा पाटील यांच्यासह पोलीस, महसूल, अग्निशमन दलांसह सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रयत्न केले.घटनाक्रम

  • मंगळवारी पहाटे ५ वाजता - गणपतीपेठमार्गे शहरात प्रवेश
  • सकाळी ७.३० - पटेल चौक, स्टेशन रोडमार्गे मार्केट यार्डात शिरकाव. तेथे बंदिस्त करण्यात यश
  • सकाळी ९.३० - पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून गव्याची पाहणी
  • सकाळी ११ - मार्केट यार्ड परिसरात जमावबंदी आदेश लागू
  • दुपारी २.१५ - कोल्हापूर, पुण्याची रेस्क्यू टीम दाखल
  • दुपारी ३ - अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा
  • दुपारी ४- वाहनांव्दारे पुढे आणण्याचा प्रयत्न
  • रात्री ९ - रेस्क्यू ऑपरेशन पुन्हा सुरू
  • रात्री १० - ऑपरेशन पुन्हा थांबवले
  • रात्री १२.४५ - पुन्हा मोहीम सुरू
  • रात्री १-३० - गवा कंटेनरमध्ये शिरला
  • रात्री ३ - गव्याची वैद्यकीय पथकाकडून तपासणी
  • रात्री ३.३० वाजता गवा घेऊन कंटेनर रवाना
  • बुधवारी सकाळी ९.३० वाजता- गव्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश
टॅग्स :Sangliसांगली