शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

देशासाठी सांगली जिल्ह्यातल्या १८६ वीरांचे बलिदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:28 PM

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतरही देशसेवेसाठी जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी मोलाचे योगदान दिले आहे. गेल्या ७० वर्षांत जिल्ह्यातील १८६ जवानांनी भारताच्या रक्षणासाठी बलिदान दिले आहे. आजही लष्कर, नौसेना, वायुसेना या तीनही दलात जिल्ह्यातील ६ हजार ५०० जवान सीमेवर शत्रूंशी दोनहात करीत असून, आजी-माजी ८० सैनिकांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावीर ...

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतरही देशसेवेसाठी जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी मोलाचे योगदान दिले आहे. गेल्या ७० वर्षांत जिल्ह्यातील १८६ जवानांनी भारताच्या रक्षणासाठी बलिदान दिले आहे. आजही लष्कर, नौसेना, वायुसेना या तीनही दलात जिल्ह्यातील ६ हजार ५०० जवान सीमेवर शत्रूंशी दोनहात करीत असून, आजी-माजी ८० सैनिकांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावीर चक्र, वीर चक्र आदी शौर्यपदकांनी गौरवही केला आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरुध्द चळवळीत पाच शहीद झाले आहेत. १९४८ पासून ते आजअखेरचा इतिहास पाहिल्यास, प्रत्येक युध्दात सांगली जिल्ह्यातील सैनिकांनी मोठी कामगिरी करून देश रक्षण करताना स्वत:चे बलिदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान, चीन व श्रीलंकेमधील बंडखोरांबरोबर झालेल्या युध्दात तसेच अतिरेक्यांबरोबर झालेल्या लढ्यांत आजपर्यंत जिल्ह्यातील १८६ जवानांनी बलिदान दिले. देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आजपर्यंत विविध पदकांनी ७३ जणांना सन्मानित केले आहे. १९६२ मध्ये भारत-चीन युध्दात आठ वीरांनी प्राण खर्ची घातले. १९७१ मध्ये पाकिस्तानबरोबर झालेल्या युध्दात शहीद झालेले मणेराजुरीचे जवान पांडुरंग साळुंखे यांना मरणोत्तर महावीर चक्र पदकाने गौरविण्यात आले. जिल्ह्यात आजपर्यंत वीर चक्र पदकाने ८, शौर्य पदकाने १, सेना, नौसेना पदकाने २४ माजी आणि सहा आजी सैनिकांचा गौरव केला आहे. युध्द सेवा पदकाने १, अतिविशिष्ट सेवा पदकाने ५ व मिशन इन डिस्पॅच शौर्य पदकाने ३० जवानांना सन्मानित केले आहे. अति विशिष्ट सेवा पदक एका आजी सैनिकाने आणि सहा माजी सैनिकांनी पटकाविले आहे.सांगली जिल्ह्यातील माजी सैनिकांची संख्या १९ हजार ४८७ इतकी असून, दिवंगत सैनिकांच्या पत्नींची संख्या पाच हजार ४६१ इतकी आहे. वीर पत्नी ८१ आणि वीर माता १५, तर वीर पित्यांची संख्या सहा आहे. दुसऱ्या महायुध्दातील सैनिक व विधवांची ७७१ संख्या आहे. सीमेच्या रक्षणासाठी आजही सांगली जिल्ह्यातील सहा हजार ते सात हजार सैनिक कार्यरत असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन सुनील गोडबोले यांनी दिली.स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब पाटील यांनी सांगितले की, स्वातंत्र्यपूर्व चळवळीतही सांगली जिल्ह्याचे मोठे योगदान राहिले आहे. सुमारे पाच हजारहून अधिक ज्ञात, अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी चळवळीत सहभाग घेतला. स्वातंत्र्य चळवळीत अनेक ज्ञात-अज्ञातांनी सहभाग घेतला. त्यामध्ये सुमारे पाच हजार स्वातंत्र्यसैनिकांना ताम्रपट देण्यात आले. सुरुवातीला जे स्वातंत्र्यसैनिक अपंग, निराधार होते, त्यांना दीडशे रुपये मानधन देण्यात येत होते. १९७० च्या सुमारास स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन योजना लागू करण्यात आली. आता यात वाढ झाली आहे.सैन्यातील टक्का : घसरतोयसैन्यदलात जाणाºयांची संख्या घटत आहे, ही चिंतेची बाब आहे. सैन्यदलाबाबत तरुणांमध्ये गोडी निर्माण झाली पाहिजे, यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करीत आहोत. मी माझ्यापासून सुरुवात केली आहे. माझी कन्या हिमीका कल्याणी मेजर असून ती सध्या हैदराबाद येथे कार्यरत आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा सैनिक कल्याणचे कर्नल बी. डी. कल्याणी यांनी दिली.ब्रिटिशांविरुध्दच्या युध्दात पाच स्वातंत्र्यसैनिक शहीदब्रिटिशांविरुध्द युध्दात पाच स्वातंत्र्यसैनिक शहीद झाले. यामध्ये हुतात्मा किसन अहिर, अण्णासाहेब पत्रावळे, बाबूराव जाधव, शेगाव (ता. वाळवा) येथील रंगराव (दादा) पाटील व किर्लोस्करवाडी येथील किर्लोस्कर कंपनीतील कर्मचारी उमाशंकर रेवाशंकर पंड्या यांचा समावेश आहे.माजी सैनिक, विधवा यांची संख्यातालुका माजी सैनिक विधवा एकूणआटपाडी ३०१ ७४ ३७५जत १५०९ ५३३ २०४२क़महांकाळ २९७२ ११४४ ४११६मिरज ३३१४ १६७७ ४९९१शिराळा ३९२ ७६ ४६८खानापूर ६८५ १६२ ८४७तासगाव २७४७ ९८५ ३४५९पलूस ४४४ १७३ ६१७कडेगाव ४२७ १०५ ५३२वाळवा १५०८ ५३२ २०४०एकूण १४०२६ ५४६१ १९४८७