आरोग्य केंद्रात मंगळवारी १५६ जणांच्या अँटिजन टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये कामेरी ८, इस्लामपूर व येडेनिपाणी प्रत्येकी ३, तुजारपूर १ असे १५ जण कोरोनाबाधित झाले. १४१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे व डॉ. चिन्मया कुलकर्णी यांनी दिली. १ फेब्रुवारीपासून ८ जुलैअखेर कामेरीत एकूण ५४६ जण कोरोनाबाधित झाले आहेत. सध्या ६६ ॲक्टिव्ह रुग्णांच्यावर होम व जि.प. शाळा आयसोलेशन केंद्रात उपचार सुरू आहेत. दहा जणांचा मृत्यू झाला असून, ४७० जण कोरोनातून बरे झाले आहेत. कामेरी येथे रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूदर १.८३ टक्के आहे. ही एकमेव दिलासादायक बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे असल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
कामेरीत दोन दिवसात १९ कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:17 AM