शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

पुणे-मिरज-लोंढा मार्गासाठी ५४० कोटी-: क-हाड-चिपळूण, कोल्हापूर- वैभववाडी मार्गाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 11:23 PM

कोल्हापूर-मिरज विद्युतीकरण पूर्ण होऊन या मार्गावर विद्युत इंजिनद्वारे प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. दुहेरीकरणाच्या कामासोबत नवीन प्रस्तावित लोणंद-बारामती, कºहाड-चिपळूण, फलटण-पंढरपूर व हातकणंगले-इचलकरंजी या नवीन रेल्वेमार्गांच्या सर्वेक्षणासाठी गतवर्षी प्रत्येकी दहा लाखांची तरतूद करण्यात आली होती.

ठळक मुद्देअर्थसंकल्पात निधीची तरतूद

सदानंद औंधे।मिरज : केंद्रीय अर्थसंकल्पात यावर्षी पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासाठी ५४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, क-हाड-चिपळूण, कोल्हापूर-वैभववाडी, हातकणंगले-इचलकरंजी या नवीन रेल्वेमार्गांच्या उभारणीसाठी निधीची तरतूद केली नसल्याने नवीन रेल्वेमार्गांचे काम रखडण्याची शक्यता आहे.

गतवर्षी रेल्वे अर्थसंकल्पात पुणे-मिरज दुहेरीकरणासाठी ५८५ कोटी रुपये व पुणे-मिरज-कोल्हापूर विद्युतीकरणासाठी १५४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यावर्षी अर्थसंकल्पात पुणे-मिरज-लोंढा या ४६७ किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरणासाठी ५४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोल्हापूर-मिरज विद्युतीकरण पूर्ण होऊन या मार्गावर विद्युत इंजिनद्वारे प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. दुहेरीकरणाच्या कामासोबत नवीन प्रस्तावित लोणंद-बारामती, कºहाड-चिपळूण, फलटण-पंढरपूर व हातकणंगले-इचलकरंजी या नवीन रेल्वेमार्गांच्या सर्वेक्षणासाठी गतवर्षी प्रत्येकी दहा लाखांची तरतूद करण्यात आली होती.

यावर्षी अर्थसंकल्पात आवश्यक निधीची तरतूद करून कोल्हापूर-वैभववाडीसह प्रस्तावित नवीन रेल्वेमार्गाचे काम सुरू करण्याची मागणी होती. मात्र, बारामती-लोणंद मार्गासाठी तीन कोटी व कºहाड-चिपळूण, कोल्हापूर-वैभववाडी, हातकणंगले-इचलकरंजी या सर्वेक्षण पूर्ण झालेल्या नवीन रेल्वेमार्गांसाठी कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही.

सर्व पॅसेंजर व डेमू रेल्वेगाड्यांत सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. मिरज व कोल्हापूर मॉडेल रेल्वेस्थानके निर्मितीसाठीही अद्याप निधी उपलब्ध झाला नाही. मिरज-पंढरपूर मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या अतिशय कमी आहे. या मार्गावर रेल्वेगाड्या वाढविण्याकडे दुर्लक्ष आहे. पुणे-मिरज दुहेरीकरणासोबत या मार्गावर भिलवडी, नांद्रेसह पुण्यापर्यंत सात ठिकाणी उड्डाणपूल व आठ ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. मिरज-बेळगाव व मिरज-कोल्हापूर मार्गावर तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. कºहाड ते मिरजदरम्यान ताकारी-शेणोली दरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले असून, सांगली ते ताकारी या मार्गावरील रेल्वेरूळ बदलण्यात येणार आहेत. मिरज स्थानकात पाणीपुरवठा व्यवस्था, विद्युतपुरवठा व्यवस्थेसाठी निधी देण्यात आला आहे. मिरज-पुणे, मिरज-कुर्डुवाडी मार्गांवर रेलपथ नूतनीकरण, उड्डाणपूल व भुयारी मार्गासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

कोल्हापूर व मिरज या अ दर्जाच्या रेल्वे स्थानकात वायफाय सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर कोच इंडिकेटर, सरकता जिना या सुविधांसाठी प्रवाशांना पाठपुरावा करावा लागणार आहे. रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण वगळता कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांतील प्रवाशांच्या मागण्यांची दखल घेण्यात आलेली नाही.

यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात नवीन रेल्वेमार्गासाठी निधी मिळाला नसल्याने नवीन रेल्वेमार्गांचे काम रखडणार आहे. कोल्हापूर-वैभववाडी, कºहाड-चिपळूण या नवीन रेल्वेमार्गांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, हे काम सुरू झाले नाही तर अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.- सुकुमार पाटील, सचिव, रेल्वे कृती समिती.

 

रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेच्या पुणे विभागासाठी भरीव आर्थिक तरतूद केलेली नाही. मिरज, सांगली, सातारा, कोल्हापूर रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करावे, पॅसेंजर गाड्यांचे डबे वाढवावेत, या मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. रेल्वेच्या खासगीकरणाच्या धोरणाचा प्रवाशांना फटका बसणार आहे.-किशोर भोरावात,मिरज रेल्वे सल्लागार समिती सदस्य

टॅग्स :konkanकोकणrailwayरेल्वेBudgetअर्थसंकल्प