सांगली : जिल्ह्यातील २ लाख ८१ हजार १३१ कृषी पंप ग्राहकांपैकी सात एचपीपर्यंतचे दोन लाख ६६ हजार ६११ ग्राहक आहेत. या ग्राहकांना शासनाकडून १०० टक्के वीज सवलत मिळणार आहे. तीन महिन्याला ८१ कोटी ४५ लाख रुपयांची सवलत कृषी पंप ग्राहकांना मिळणार आहे.
जिल्ह्यातील कृषी पंपाची आतापर्यंत दोन हजार ३२४ कोटींपर्यंत थकबाकी आहे. या थकबाकीचा प्रश्न शासनाने सोडविण्याला नाही. पण, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने सात एचपीपर्यंतच्या कृषी पंपाला १०० वीज माफीची घोषणा केली आहे. एक ते सात एचपीपर्यंतचे जिल्ह्यात २ लाख ६६ हजार ६११ वीज ग्राहकांना फायदा होणार आहे. पण, सात एचपीच्यावरील सर्व वीज ग्राहकांना वीज सवलतीमधून वगळण्यात आले आहे. यामुळे मोठ्या पाणी पुरवठा योजनांचे वीज ग्राहक शासनाच्या वीज माफीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. म्हणून या वीज ग्राहकांमधून राज्य शासनाच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीज माफीबद्दल शासनाकडून कोणतेही लेखी आदेश नसल्यामुळे तेही चिंतेत आहेत. जिल्ह्यातील कृषी पंपाची वीज बिलाची थकबाकी २ हजार ३२४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीबद्दल शासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. पण, शासनाने सात एचपीपर्यंतच्या कृषी पंपाला वीज माफी जाहीर केली आहे. वीज माफी कधीपासून देण्यात येणार आहे, याबद्दलही स्पष्टता नाही.
असा होणार फायदा ग्राहक - तीन महिन्याचे बिल१ ते ३ एचपी पंप - १०६७९४ - २१.०७ कोटी३ ते ५ एचपी पंप - १३८३६३ - ५०.१३ कोटी५ ते ७ एचपी पंप - २१४५४ - १०.२५ कोटी७ ते १० एचपी पंप - ११२७० - ६.८३ कोटी१० एचपी पुढील - ३२५० - ३.२८ कोटीएकूण - २८११३१ - ९१.५८ कोटी