शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

सांगलीत कुरिअरमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगत एकाला २० लाखांचा गंडा

By शरद जाधव | Published: November 21, 2023 6:10 PM

नार्कोटिक्स विभागाकडे तक्रार करणार असल्याचे सांगत प्रकार

सांगली : मुंबई ते तैवान पाठविण्यात आलेल्या कुरिअरमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगत नार्कोटिक्स विभागाकडे तक्रार करण्याची धमकी देत एकाला २० लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अनिकेत अरूणकुमार कदम (सध्या रा. पुणे, मूळ रा. दक्षिण शिवाजीनगर, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कदम यांच्या वडिलांना अज्ञाताने फोन करून ही फसवणूक केली.फिर्यादी कदम यांच्या वडिलांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला होता. यावेळी तुमचे आधारकार्ड वापरून एक कुरिअर बुक करण्यात आले असून, मुंबई ते तैवान पाठविण्यात येणाऱ्या या कुरिअरमध्ये कपडे, पासपोर्ट, क्रेडिट कार्ड आणि ड्रग्ज सापडल्याचे सांगितले. याबाबत नार्काेटिक्स विभागागडे तक्रार करू, असे त्यांना सांगण्यात आले.यावेळी स्काईप ॲप मोबाइलवर घेण्यास सांगून त्यावर पुढील कारवाई हाेणार असल्याचे सांगण्यात आले. यानंतर दिल्ली, गुरगाव, हरियाणा, चेन्नई, पुणे या ठिकाणी १७ बँक खाते खोलण्यात आल्याचे सांगण्यात आले. हे खाते मोहमद इस्माईल मलीक या व्यक्तीसोबत संयुक्तरीत्या काढण्यात आल्याचेही सांगण्यात आले.मलीक या व्यक्तीवर मनी लाँड्रिंग व ड्रग ट्रॅफीकिंचे गुन्हे दाखल असून, तुम्ही निर्दोष होईपर्यंत खाते सील करावे लागेल, असे सांगत फिर्यादीच्या वडिलांकडून २० लाख रुपये उकळण्यात आले. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी