अंकलखोप (ता. पलूस) : येथील अंकलेश्वर क्रेडिट सोसायटीला २० लाखांचा नफा झाल्याची माहिती संस्थापक राजेश बापूसाहेब चौगुले यांनी दिली. संस्थेच्या स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग 'अ' मिळाला आहे. चौगुले म्हणाले की, २० लाखांचा नफा झाला असून, शंभर टक्के वसुली आहे. ठेवीमध्ये दुप्पट वाढ आहे. संस्थेच्या एकूण ठेवी दहा कोटी १४ लाखांच्या आहेत. संस्थेचे एकूण कर्ज वाटप ७ कोटी १५ लाखांचे झाले आहे. जीवन समृद्धी ठेव, अंकलेश्वर लखपती ठेव योजना अशा अनेक योजना आहेत. अंकलेश्वर कृषी सेवा केंद्र, अंकलेश्वर पशुखाद्य सेवा व अंकलेश्वर हायटेक नर्सरी या माध्यमातून सर्व सभासद व शेतकरी बांधवांना सेवा पुरवली जात आहे. नागरिकांना मोफत सॅनिटायझर, मास्क वाटप करून संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख अकरा हजारांचा धनादेश देण्यात आला.
अंकलेश्वर सोसायटीला २० लाखांचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:26 AM