सांगली : तुंग (ता. मिरज) येथे पैशाच्या देवाण-घेवाणीतून दोन गटात झालेल्या मारामारीप्रकरणी दोन्ही गटांच्या ४० जणांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील २० जणांना शुक्रवारी पहाटे अटक करण्यात यश आले आहे. गुरुवारी सकाळी मारामारीची ही घटना घडली होती. अटक केलेल्यांमध्ये तुकाराम चंदर जाधव (वय ४२), आकाश आकाराम जाधव (२५), ईश्वरा पांडुरंग जाधव (६०), सखाराम चंदर जाधव (४८), बापू शंकर जाधव (४०), विलास बाबू जाधव (६०), उत्तम बाबू जाधव (३०), सावकार बाबू जाधव (२२), मोहन बाबू जाधव (२५), युवराज वसंत जाधव (२२), राम विलास जाधव (३८), लखन विलास जाधव (२०), बापू हिंदुराव जाधव (५०), बाळू प्रल्हाद जाधव (२५), सुभाष बापू जाधव (३३), अर्जुन बापू जाधव (२४), अर्जुन बबन जाधव (२४), करण वसंत जाधव (१९), तानाजी ईश्वरा जाधव (३५) व गुलाब वसंत जाधव (वय ३०, सर्व रा. तुंग) यांचा समावेश आहे. बाबासाहेब शंकर जाधव व भरत बाबूराव जाधव यांनी परस्पराविरुद्ध फिर्याद दिली आहे. बाबासाहेब यांच्या फिर्यादीनुसार १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मजुरीचे तीनशे रुपये देण्यास नकार दिला, याचा जाब विचारण्यास गेल्यानंतर मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भरत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पन्नास हजार रुपये व्याजासह दिले नाहीत, म्हणून पैसे मागण्यास गेल्यानंतर संशयितांनी मारहाण केली असल्याचे म्हटले आहे. दोन्ही गटाने काठी, तलवार, चाकू व दगडांचा वापर केला. घटनेनंतर संशयित पसार झाले होते. काही संशयित तुंगमध्येच एका इमारतीच्या गच्चीवर झोपले असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव, सहायक फौजदार बाळासाहेब पाटील, चैतन्य यादव, शिवानंद गव्हाणे यांच्या पथकाने तेथे छापा टाकून त्यांना अटक केली. (प्रतिनिधी) संशयित रुग्णालयात दोन्ही गटातील प्रत्येकी सात, असे १४ संशयित जखमी आहेत. त्यांची डोकी फुटली आहेत. ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती ठीक होताच त्यांना अटक केली जाईल, असे निरीक्षक जाधव यांनी सांगितले.
तुंगमधील २० जणांना अटक
By admin | Published: November 06, 2015 11:34 PM