लोकमत न्यूज नेटवर्क
संजयनगर : डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुपतर्फे रविवारी कृष्णा काठावर २०० बांबूची रोपे लावण्यात आली. कृष्णाकाठ सुरक्षित रहावा, काठावरच्या मातीची धूप होऊ नये, पुराचा धोका काठाला कमी प्रमाणात व्हावा म्हणून शेरीनाल्यापासून उत्तरेला कृष्णा काठावर साधारणपणे ३० फूट उंचीवर बांबू रोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे संस्थापक शशिकांत ऐनापुरे, अध्यक्ष अरुण कांबळे, सचिव पद्मजा पाटील, धनंजय वाघ, मनोजकुमार मुळीक यांनी केले.
तर सोनाली जाधव, अन्सार मगदूम, आदिती कुंभोजकर, रुकसाना मगदूम, अर्चना ऐनापुरे, प्रवीण मगदूम, बाळासाहेब शितोळे, ऋषिकेश ऐनापुरे, मानवी बरगाले, नित्या पाटील, दिनेश पाटील, मुस्तफा मुजावर, अल्फिया मगदूम, सचिन चोपडे, प्रा. विकास आवळे, पुष्कर मगदूम, अमेय पाटील आदी सहभागी झाले होते. तक्षशिला शाळेचे शिक्षक व विद्यार्थीही सहभागी झाले होते. माझी माय कृष्णा लोकचळवळचे प्रणेते डॉ. मनोज पाटील यांनी प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली.