सांगली : कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जानेवारी महिन्यात लस येण्याची अपेक्षा असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण होईल. लसीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांंच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन केला आहे. पहिल्या टप्प्यात ३० हजारजणांच्या लसीकरणाचे उद्दीष्ठ्य आहे.
जिल्हास्तरीय फोर्समध्ये जिल्हा परिषदेचे सीईओ, पोलीस अधिक्षक, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्याधिकारी, महापालिका आरोग्याधिकारी, आयएमएचे प्रतिनिधी आदींचा समावेश आहे. तालुकास्तरीय टास्क फोर्समध्येही याच गटातील प्रतिनिधी असतील.
नंतरच्या टप्प्यात सर्वसामान्यांना लसीकरणासाठी संकेतस्थळ किंवा ॲपवरुन नोंदणी करता येईल. लसीकरणाचा दिवस मोबाईलवरून कळविला जाईल. लसीकरण झाल्याचे शासकीय प्रमाणपत्र मिळेल.िल्ह्यात ९१ शीतसाखळी केंद्रे आहेत. त्यामध्ये आरोग्य केंद्रे ६०, ग्रामिण रुग्णालये १५ व महापालिकेची रुग्णालये १६ आहेत. डीप फ्रीझरची संख्या १२६ असून त्याची साठवणूक क्षमता ११ हजार ६९६ लिटर आहे. आईसलाईन रेफ्रीजरेटर १४० असून त्यामध्ये ८ हजार ७६० लिटर लस साठविता येते. त्याद्वारे ग्रामिण व शहरी हेल्थ वर्करना लस पोहोचविली जाईलिल्हा प्रशासनाकडे २६६० व्हॅक्सिन कॅरीअर, तर १९३७० कोल्ड बॉक्स पॅक आहेत. उणे १५ ते २५ अंश तापमानाला गोठविलेले कोल्ड बॉक्स पॅक लसीला सुरक्षित ठेवतात. पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, पोलीस, महसूल, गृहरक्षक, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे लसीकरण होईल. नंतर ५० वर्षांवरील ज्येष्ठांना लस मिळेल.
-------------