खरसुंडी : आटपाडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र खरसुंडी येथील सिद्धनाथाच्या पौष यात्रेनिमित्ताने शेळ्या, मेंढ्याचा बाजार भरला आहे. यामध्ये परिसरातील आणि इतरही जिल्ह्यातील शेतकरी शेळ्या, मेंढ्या घेऊन नाथनगरीत दाखल झाले आहेत. वसंत मारुती गडदे (रा. सांगली) यांनी उस्मानाबाद जातीच्या ११० किलो वजनाच्या बोकडाची किंमत २१ लाख इतकी सांगितली आहे. त्यास १० लाखांची मागणी आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिध्दनाथ पौष यात्रा रद्द झाली असली तरी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या पुढाकाराने लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या सहकार्याने शेळ्या, मेंढ्या आणि बैल बाजार भरवण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.
पुढील काही दिवस जातिवंत खिलार जनावरांचा बाजार भरत असून, कोट्यवधींची उलाढाल होईल, असा अंदाज व्यक्त करीत यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रेकरूंनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून स्वतःची काळजी घेत सहकार्य करावे, असे आवाहन मार्केट कमिटी सभापती भाऊसाहेब गायकवाड यांनी केले आहे.
चाैकट
लाखांची उलाढाल
यात्रेसाठी पाणी व इतर सुविधा कृषी उत्पन्न समिती, ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्न करीत आहेत. दोन दिवसांत शेळ्या, मेंढ्यांच्या खरेदी विक्रीतून सात लाखांवर उलाढाल होईल, असा अंदाज मार्केट कमिटीकडून व्यक्त करण्यात आला आहे.
फोटो-२८खरसुंडी१ व २