शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
2
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
3
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
4
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
6
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
7
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
8
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
9
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
10
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
11
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
12
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
13
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
14
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
15
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
16
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
17
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
18
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले
19
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
20
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना

केवायसी करतो म्हणून सांगितले, सांगलीतील निवृत्त बँक कर्मचाऱ्याच्या खात्यातील २१ लाख रूपये हडप केले

By घनशाम नवाथे | Updated: February 12, 2025 17:53 IST

सांगली : बँकेतील निवृत्त कर्मचाऱ्यास अकाऊंट सस्पेंड होईल अशी भीती घालून ऑनलाइन ‘केवायसी’ पूर्ण करतो असे सांगून खाते ‘हॅक’ ...

सांगली : बँकेतील निवृत्त कर्मचाऱ्यास अकाऊंट सस्पेंड होईल अशी भीती घालून ऑनलाइन ‘केवायसी’ पूर्ण करतो असे सांगून खाते ‘हॅक’ करून २१ लाख ७५ हजार रूपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या फसवणुकीबाबत दिलीप मारूतीराव शिंदे (रा. प्रथमेश बंगला, घनशामनगर, सांगली) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.दिलीप शिंदे हे बँक ऑफ इंडियाचे निवृत्त कर्मचारी आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये ते घरी असताना त्यांना एका मोबाइल क्रमांकावरून एसएमएस आला. त्यामध्ये तुमचे बँक ऑफ इंडियाचे खाते आज सस्पेंड होईल. तुम्ही बँक व्यवस्थापक राहुल गुप्ता यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क सांगा असे नमूद केले होते. शिंदे यांनी थोड्या वेळाने दिलेल्या मोबाइल क्रमांकावर कॉल केला. तेव्हा समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने मी राहुल गुप्ता हेड ऑफिस, बँक ऑफ इंडिया मुंबई येथून बोलतो आहे असे सांगितले. तुमचे अकाऊंट सस्पेंड झाले असून ते ॲक्टिव्ह करण्यासाठी केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी आधारकार्ड क्रमांक, बँकेच्या खात्याला लिंक असलेला मोबाइल क्रमांक विचारून घेतला. तसेच एक व्हॉटस्अॅप क्रमांक देऊन त्यावर माहिती शेअर करायला सांगत मोबाइल सुरूच ठेवला. शिंदे यांनी सांगितलेल्या व्हॉटस्अॅप क्रमांकावर आधार कार्ड नंबर, खात्याला जोडलेला मोबाइल क्रमांक, पिन क्रमांक शेअर केला.राहुल गुप्ता म्हणून बोलणाऱ्या व्यक्तीने तुम्ही ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे तुमचे खाते ऑनलाइन करत आहे, असे सांगून मोबाइल चालू ठेवा अशा सूचना केल्या. १५ ते २० मिनिटात प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगितले. परंतु एवढ्या कालावधीत शिंदे यांचे खातेच भामट्याने ‘हॅक’ केले. त्यानंतर त्यांच्या खात्यातील २१ लाख ७५ हजार रूपये परस्पर काढून घेतले.बँकेच्या खात्यातील मोठी रक्कम काढून घेतल्याचे दिसून येताच शिंदे यांना धक्का बसला. त्यांनी दि. १५ नोव्हेंबर रोजी बँकेशी संपर्क साधून हा प्रकार सांगितला. गेले काही दिवस तांत्रिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी दि. ११ रोजी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बीएनएस ३१८ (४), ३१९ (२), माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस ही आश्चर्यचकितबँकेतून बोलत असल्याचे सांगून केवायसी पूर्ण करण्यास सांगून फसवणूक केल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. परंतू निवृत्त बँक कर्मचाऱ्यांचीच अशा प्रकारे फसवणूक केल्यामुळे पोलिस ही आश्चर्यचकित झाले आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँकcyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी