लोकमत न्युज नेटवर्क
कसबे डिग्रज : गेल्या दोन दिवसांत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने कोरिना प्रतिबंधासाठी विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येत आहे. कसबे डिग्रज परिसरात आतापर्यंत २२० दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विनाकारण फिरणारे, मास्क न वापरणे, कागदपत्रे न दाखविणे, गर्दी करुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित दुचाकीधारकांना न्यायालयात खटले भरण्यात आले आहेत.
ही कारवाई सांगली ग्रामीण पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे, सहायक पोलीस निरीक्षक निशनदार, विद्यासागर पाटील उपनिरीक्षक मगदूम यांच्यासह १५ पोलीस, १३ होमगार्ड यांनी केली. कसबे डिग्रज, तुंग, कवठे पिरण, दुधगाव, बुधगाव, कवलापूरसह ग्रामीण भागात कारवाई केली आत आहे. कोणत्याही परिस्थितीत अत्यावश्यक कामाशिवाय लोकांनी फिरू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.