शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

Sangli: कृषी कंपनीची २३ लाखांची आर्थिक फसवणूक; लेखापाल दाम्पत्यासह बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 4:10 PM

सांगली : कृषी क्षेत्रात कार्यरत ऑरबीट क्रॉप मायक्रोनुट्रीयंटस् या कंपनीची २३ लाख २५ हजार २८४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार ...

सांगली : कृषी क्षेत्रात कार्यरत ऑरबीट क्रॉप मायक्रोनुट्रीयंटस् या कंपनीची २३ लाख २५ हजार २८४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उत्तम महावीर अडसूळ (वय ३७), भाग्यश्री उत्तम अडसूळ (३३, दोघे, रा. झिल इंटरनॅशनलनजीक, कुपवाड) रविराज मुरग्याप्पा पळसे (४२, रा. दत्तनगर, कर्नाळ रस्ता) आणि विवेक रंजन (४९, रा. श्रीराम संकुल, एस.टी. कॉलनी रस्ता, विश्रामबाग) यांच्यावर विश्रामबाग पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दीपक प्रकाश राजमाने (रा. सिद्धिविनायकपूरम) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजयनगर परिसरात ऑरबीट क्रॉप मायक्रोन्युट्रीयंटस् ही कृषी क्षेत्रात कार्यरत कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीत मुख्य लेखापाल म्हणून उत्तम अडसूळ आणि सह लेखाकार भाग्यश्री अडसूळ हे पती-पत्नी कार्यरत होते. आर्थिक सर्व व्यवहार दोघेच सांभाळत होते. कंपनीच्या देखभालीसाठी आणि कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी फिर्यादी दीपक राजमाने यांनी कोरे धनादेश आडसूळ यांच्या ताब्यात दिले होते. दोघांची युनियन बॅँकेचे अधिकारी रविराज पळसे आणि मार्केट यार्ड येथील शाखाधिकारी विवेक रंजन यांच्याशी ओळख झाली होती. चौघांनी आर्थिक गैरव्यवहार करण्याचा प्लॅन आखला.

२०१८ पासून आडसूळ हे धनादेशावर परस्पर रक्कम टाकून ते पैसे काढत होते. दोघांना बँकेचे अधिकारी सामील होते. कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांनी वसूल केलेली रक्कम कंपनीच्या खात्यावर न टाकता अडसूळ हा स्वत:च्या खात्यावर वर्ग करीत होता. कंपनीचे आर्थिक व्यवहार पडताळणी केल्यानंतर फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला.२०१८ ते दि. ५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत चौघांनी २३ लाख २५ हजार २८४ रुपयांची फसवणूक केली. राजमाने यांनी गेले अनेक दिवस आडसूळ यांच्याकडून रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा केला. परंतु, फसवणूक केलेली रक्कम परत मिळाली नाही. त्यांनी राजमाने यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीAgriculture Sectorशेती क्षेत्रfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी