शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Maharashtra Budget 2023: सांगलीत होणार नवे नाट्यगृह; २५ कोटींचा निधी मंजूर

By शीतल पाटील | Published: March 09, 2023 8:00 PM

महापालिकेचे दीनानाथ नाट्यगृह चार ते पाच वर्षांपासून बंद आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून नाट्यगृहाची साडेसाती संपली नव्हती

सांगली : महापालिकेचे दीनानाथ नाट्यगृह चार ते पाच वर्षांपासून बंद आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून नाट्यगृहाची साडेसाती संपली नव्हती. अखेर श्यामरावनगर येथील महापालिकेच्या खुल्या भूखंडावर नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ३७.५० कोटींचा आराखडाही तयार केला. अखेर राज्याच्या अर्थसंकल्पात सांगलीतील नाट्यगृहासाठी २५ कोटींच्या निधीची घोषणा झाली आणि नाट्यगृहाला लागलेली साडेसाती संपुष्टात आले.नाट्यपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीत नाट्यगृहाची अवस्था बिकट आहे. विष्णुदास भावे नाट्यगृह वगळता एकही चांगले नाट्यगृह नाही. महापालिकेच्या दीनानाथ नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे. शहरात आलेल्या महापुरानंतर नाट्यगृह बंदच पडले आहे. त्यात रंगमंच, वातानुकूलित यंत्रणा, ध्वनी यंत्रणा चांगली नसल्याने महापालिकेच्या नाट्यगृहात नाटकांचे प्रयोगच झाले नाही. लावणी व इतर कार्यक्रमापुरतेच हे नाट्यगृह उरले होते. त्यामुळे नाट्यप्रेमींतून नव्या नाट्यगृहाची मागणी जोर धरू लागली होती.भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, नगरसेवक शेखर इनामदार, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम यांनी नव्या नाट्यगृहासाठी पाठपुरावा केला. महापालिकेने ३७.५० कोटींचा आराखडा तयार करून शासनाला सादर केला. भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने निधीची मागणी केली. अखेर अर्थसंकल्पात नाट्यगृहासाठी २५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.श्यामरावनगरमधील आठ एकर जागेत नाट्यगृह, ओपन लाॅन, बहुद्देशीय सभागृह, अम्पीथिएटर उभारले जाणार आहे. नाट्यगृहाची क्षमता ७५० इतकी आहे. ३७० दुचाकी व ११२ चारचाकी वाहनासाठी पार्किग, गुलमोहर, बहावा, सप्तपर्णी, रक्तचंदन आदी विविध प्रकारांची ५००हून अधिक झाडे लावण्यात येणार आहेत.

नाट्यगृहाची वैशिष्ट्ये

  • श्यामरावनगरमधील आठ एकर जागेत वातानुकूलित नाट्यगृहाची उभारणी.
  • तळमजल्यासह दुमजली इमारत.
  • नाट्यगृहाच्या दोन्ही मजल्यावर प्रत्येकी ३७५ आसनक्षमता.
  • तळमजल्यावर एक हजार क्षमतेचे सभागृह व उपहारगृह.
  • पहिल्या मजल्यावर नाट्यगृह, कलाकरांसाठी रुम.
  • दुसऱ्या मजल्यावर चार व्हीआयपी सुट व विश्रांतीगृह.

ओपन लॉन व अम्पीथिएटरनाट्यगृहाच्या आवारात खुले लाॅनची निर्मिती केली जाणार आहे. त्याची क्षमता २००० लोकांची आहे, तर ४०० आसनक्षमता असलेले अम्पीथिएटरही उभारले जाणार आहे. त्यावर ३६.३५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीBudgetअर्थसंकल्प 2023Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2023