शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

सांगली जिल्ह्यात तीन महिन्यांत वाढले २७ हजार ७४३ मतदार; कुणाला फायदा होणार?

By अशोक डोंबाळे | Published: May 04, 2024 6:19 PM

बुथ एजंटांना मोबाईल नो अलाऊड

सांगली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी २२ जानेवारीला २४ लाख ९ हजार ७७ मतदार होते. तर तीन महिन्यानंतर जिल्ह्यातील मतदारांची एकूण संख्या २४ लाख ३६ हजार ८२० झाली आहे. तीन महिन्यांत तब्बल २७ हजार ७४३ मतदार वाढले आहेत. हे वाढलेले मतदार उमेदवाराच्या विजयासाठी निर्णायक ठरू शकतात.जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी मिरज, सांगली, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ, जत अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा सांगली लोकसभा मतदारसंघ आहे. तसेच उर्वरित इस्लामपूर, शिराळा हे दोन विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येत आहेत. जिल्हा प्रशासनाने २२ जानेवारीला मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध केली. यावेळी २४ लाख ९ हजार ७७ मतदार होते. एप्रिलअखेरपर्यंत नवमतदारांनी नोंदणी केली असून २७ हजार ७४३ मतदार वाढले आहेत. सध्या २४ लाख ३६ हजार ८२० मतदारसंख्या झाली आहे. वाढलेल्या मतदाराचा कोणत्या उमेदवाराला फटका बसणार आणि कुणाला फायदा होणार हे दि. ७ मे रोजीच समजणार आहे.निवडणुकीसाठी सध्या १२ हजार २७५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांच्या खरोखर अडचणी होत्या त्यांची ड्युटी रद्द करण्यात आली आहे. आचारसंहिता अंमलबजावणी व उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात क्षेत्रीय अधिकारी, स्थिर सर्वेक्षण अधिकारी, भरारी पथके, व्हिडीओ सर्वेक्षण पथके अशी एकूण ६८ पथके जिल्ह्यात कार्यरत आहेत.

बुथ एजंटांना मोबाईल नो अलाऊडमतदानादिवशी बुथ एजंट म्हणून काम करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाता येणार नाही. त्याठिकाणी केवळ मतदान केंद्राध्यक्षांकडेच मोबाईल असणार आहे. त्याशिवाय इतर कोणाकडेही मोबाईल नसेल, याची दक्षता घेण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान करायला जाणाऱ्या व्यक्तीलाही मोबाईल शूटिंग करता येणार नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४