सांगली : जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी २०४२ जणांनी माघार घेतल्याने आता १५०३ जागांसाठी ३०७६ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवार दि. १५ रोजी मतदान होणार आहे. सुरू असलेल्या प्रक्रियेनुसार सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार गावपातळीवरील राजकारण चांगलेच तापले होते. सोमवारी जिल्ह्यातील सर्वच निवडणूक कार्यालयात उमेदवारांसह समर्थकांची गर्दी होती. जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
चौकट
तालुकानिहाय ग्रामपंचायत जागा व उमेदवार संख्या
मिरज २२ : ५५६
तासगाव ३९ : ७९८
कवठेमहांकाळ ११ : १७६
जत ३० : ५७२
आटपाडी १० : १८६
खानापूर १३ : २३१
पलूस १४ : ३१३
कडेगाव ९ : १७२
वाळवा २ : ३२
शिराळा २ : ४०