सांगली : येथील मोहित चौगुले यांनी मित्राच्या मदतीने सांगलीतून बुलेटवरून भारत-पाक सीमेपर्यंत धडक मारली. ३१५० किलोमीटरचा प्रवास करुन शुक्रवारी सकाळी ते सांगलीत दाखल झाले. त्यांच्यासोबत पाच मित्रांची फौजही होती.मोहित चौगुले वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांचे पुत्र आहेत. ७ डिसेंबरला ते सांगलीतून रवाना झाले. त्यांच्यासोबत गौतम पाटील, संदीप श्रीनाथ, स्वप्ना राव, अर्चिता जी. व आॅनरिला बॅनर्जी हे पाचजण होते. मोहित चौगुले व गौतम पाटील बुलेटवरून गेले, तर अन्य चौघे मोटारीतून त्यांच्या मागोमाग होते.
सायंकाळी ते पुण्यात गेले. तेथून सिल्वासामध्ये गेले. तिथे मुक्काम करुन दुसऱ्यादिवशी ते सिल्वासामधून अहमदाबादला गेले. तेथून बचाऊ येथे गेल्यानंतर त्यांनी दोन दिवस मुक्काम केला. पुढे भूजमार्गे ते भारत-पाक सीमेपर्यंत गेले.वाघा सीमेवरुन परताना त्यांनी राजस्थान मधील रण आॅफ कच्छ फेस्टिव्हलचा आनंद घेतला. तेथून ते सूरतला गेले. त्यानंतर पुण्यात आले. शुक्रवारी सकाळी ते ३१५० किलोमीटरचा प्रवास करून सांगलीत दाखल झाले. आभाळमाया फौंडेशनच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. गौतम पाटील यांना या भागातील माहिती असल्याने त्याचा फायदा झाला. या तरुणांचा सात दिवसांचा प्रवास अत्यंत सुखकर झाला.रण आॅफ कच्छतरुणांनी वाघा सीमेवरुन परताना राजस्थानमधील रण आॅफ कच्छ फेस्टिव्हलचा आनंद घेतला. तेथून ते सूरतला गेले. त्यानंतर पुण्यात आले. शुक्रवारी सकाळी ते ३१५० किलोमीटरचा प्रवास करून मित्रांसह सांगलीत दाखल झाले.