सांगली :
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुपारपर्यंत टक्के मतदान झाले. सकाळी सातपासूनच विविध मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे पहायला मिळाले. विशेषत: तरुण मतदार आणि महिला मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्या. मतदारांना केंद्रांवर आणण्यासाठी खासगी वाहनांचा सर्रास वापर झाला. मळाभागातून मतदारांना गावात आणण्यासाठी उमेदवारांनी वाहने उपलब्ध केली. पोलीसांनी संवेदनशील व अतिसंवेदनशील निश्चित केलेल्या गावांत विशेष बंदोबस्त ठेवला होता. काही गावांत शनिवारी सायंकाळी संचलनही केले. केंद्रामध्ये घुसखोरी करु पाहणाऱ्या उत्साही कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी पोलीसांना धावपळ करावी लागत होती.
काही केंद्रांवर इव्हीएम यंत्रांमध्ये बिघाडाच्या तक्रारी आल्या काही केंद्रांवर चिन्हे व आकडे दिसत नसल्याच्या तक्रारीही मतदारांनी केल्या.दुपारी बारा वाजेपर्यंत तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी अशी : मिरज २९.९४, सांगली पश्चिम २९.२८, तासगाव ३३.५३, कवठेमहांकाळ ३०.२६, जत २९.८७, खानापूर २७.९७, आटपाडी ३१.४९, पलूस ३५.२३, कडेगाव ३१.२५, वाळवा ३३.१७, आष्टा अप्पर ३५.७४, शिराळा ३०.८०, एकूण ३१.४९ टक्के.