शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

सोयाबीनचे ३३ नमुने अपात्र

By admin | Published: July 16, 2014 11:29 PM

डी़ एस़ शिंगे : सहा दोषी कंपन्यांवर खटला दाखल होणार

सांगली : कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील २८२ कृषी केंद्रांतून २८२ सोयाबीन आणि भात बियाणांचे नमुने घेतले होते़ यापैकी १४९ बियाणांची तपासणी केली असून, ३३ बियाणे अपात्र ठरले आहेत़ यामध्ये सोयाबीनचे ३२ आणि भात बियाणाच्या एका नमुन्याचा समावेश आहे़ याप्रकरणी सहा कंपन्यांवर खटला दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा गुणनियंत्रक डी़ एस़ शिंगे यांनी दिली़जिल्हा परिषद आणि राज्य शासनाकडील कृषी विभागाने खरीप हंगामातील बियाणे, खते आणि कीटकनाशकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ११ गुणनियंत्रकांची नियुक्ती केली आहे़ खत कंपन्यांच्या निकृष्ट बियाणांना लगाम घालण्यासाठी गुणनियंत्रकांनी २८२ कृषी सेवा केंद्रांतून २८२ सोयाबीन आणि भाताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले होते़ सोयाबीन बियाणांची उगवणक्षमता ७० टक्केपेक्षा जादा पाहिजे, परंतु सोयाबीन आणि भाताच्या ३३ बियाणे नमुन्याची उगवणक्षमता ५२ टक्केपेक्षा कमी आढळून आली आहे़ यामध्ये कृषीधन ११, ईगल सिडस् आठ, सिध्दा सिडस् पाच, महाबीज चार आणि अंकुर दोन आणि ग्रीन गोल्ड कंपनीचे तीन नमुने आहेत़ या कंपन्यांच्या बियाणांची उगवणक्षमता ५२ टक्केपेक्षा कमी आहे, अशी माहिती शिंगे यांनी दिली़ (प्रतिनिधी)जगन्नाथ कोळपे यांचे संचालकपद रद्दउपनिबंधकांची कारवाई : सयाजी पाटील यांच्या तक्रारीवर कारवाईसांगली : प्राथमिक शिक्षक संघाचे नेते जगन्नाथ कोळपे यांना शिक्षक बँकेच्या संचालकपदासाठी जिल्हा उपनिबंधकांनी अपात्र ठरविले आहे. यासंबंधीचा आदेश आजच बँकेला प्राप्त झाला. कोळपे हे भूविकास बँकेचे थकबाकीदार असतानाही त्यांनी निवडणूक लढविली होती. त्याबाबत शिक्षक समितीचे सरचिटणीस सयाजी पाटील यांनी उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. त्यांचे संचालकपद रद्द झाल्याने थोरात गटाला मोठा धक्का बसला आहे. बँकेच्या २००९ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कोळपे शिक्षक समितीतून निवडून आले होते. त्यानंतर ते बँकेचे अध्यक्षही झाले. दोन वर्षातच त्यांनी समितीला रामराम ठोकत शिक्षक संघाच्या थोरात गटात प्रवेश करीत सवतासुभा मांडला. २००५ पासून कोळपे भूविकास बँकेचे थकबाकीदार आहेत. भूविकास बँकेने वारंवार थकित कर्जाची मागणी करूनही त्यांनी कर्ज भरलेले नाही. सहकार कलम ७३ (सी) ए नुसार कोणत्याही सहकारी संस्थेचे थकबाकीदार असल्यास कायदेशीररित्या अन्य संस्थेवर संचालक पदासाठी अर्ज भरता येत नाही. तरीही कोळपे यांनी भूविकास बँकेच्या थकबाकीची माहिती लपवून शिक्षक बँकेची निवडणूक लढविली. त्यांनी शासन, सहकार खात्याची फसवणूक केली असून, त्यांचे संचालकपद अपात्र ठरवावे, अशी तक्रार समितीचे सरचिटणीस सयाजी पाटील यांनी उपनिबंधकांकडे केली होती. या तक्रारीची चौकशी करून जिल्हा उपनिबंधकांनी कोळपे यांचे संचालकपद अपात्र ठरविले आहे. तसा आदेशही शिक्षक बँकेला दिला आहे. (प्रतिनिधी)२००९ ते २०१४ या काळात बँकेचे अध्यक्ष व संचालक म्हणून कोळपे यांनी ज्या सवलतींचा लाभ घेतला, त्या सर्व बाबींची व्याजासह वसुली करावी. बँकेवर खोटेनाटे आरोप करणाऱ्या कोळपे यांची फसवेगिरी उघड झाली आहे, असा टोला सयाजी पाटील यांनी लगाविला.अपील करणार : कोळपेविश्वनाथ मिरजकर यांच्या संचालक मंडळाच्या गैरकारभाराविषयी उपनिबंधकांकडे अनेक तक्रारी केल्या. त्यामुळे शिक्षक बँक व उपनिबंधकांनी संगनमताने संचालकपद रद्द केले आहे. याविरोधात विभागीय उपनिबंधकांकडे अपील दाखल करणार असल्याचे कोळपे यांनी सांगितले. सभासदच जागा दाखवतील : शिंदेशिक्षक बँकेतील गैरकारभार संभाजी थोरात गटाने चव्हाट्यावर आणला आहे. मिरजकरांनी केलेला चुकीचा कारभार रद्द केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. कोळपे यांचे संचालकपद रद्द करण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. बँकेच्या आगामी निवडणुकीत सभासदच मिरजकर व त्यांच्या संचालकांना जागा दाखवतील, अशी प्रतिक्रिया संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी दिली.