सांगली: जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 33.88 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 103.85 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 13.27 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 9.92 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 9.86 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 5.85 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 25.39 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.04 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 122.83 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे धोम 150, कण्हेर धरणातून 1750 क्युसेक्स, तुळशी धरणातून 252 क्युसेक्स, उरमोडी धरणातून 300 क्युसेक्स, अलमट्टी धरणातून 37000 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 9.1 (45), आयर्विन पूल सांगली 11 (40) व अंकली पूल हरिपूर 13.5 (45.11).मिरज तालुक्यात 5.8 मि. मी. पावसाची नोंद
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.14 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. मिरज तालुक्यात सर्वाधिक 5.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे.
मिरज 5.8 (475), तासगाव 1.5 (423.3), कवठेमहांकाळ 0.0 (460.6), वाळवा-इस्लामपूर 4.0 (595.4), शिराळा 1.5 (1282.4), कडेगाव 3.0 (510.3), पलूस 2.0 (430), खानापूर-विटा 0.6 (590.2), आटपाडी 0.0 (418.3), जत 0.0 (277.9).