सांगली : जिल्ह्यात गेल्यावर्षी याच तारखेला नऊ टक्के पाणीसाठा होता. यावर्षी ३४ टक्के पाणीसाठा असून, जत तालुक्यातील चार तलाव कोरडे पडले आहेत. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू केल्यामुळे पाणी टंचाईच्या झळा कमी झाल्या आहेत.
जिल्ह्यातील मोठे पाच आणि लहान ७९ पाझर तलाव आहेत. या तलावांमध्ये नऊ हजार ४४०.२० दशलक्ष घन फूट पाणीसाठ्याची क्षमता आहे. या तलावात सध्या तीन हजार ८६०.४१ दशलक्ष घन फूट पाणीसाठा आहे. जत तालुक्यातील चार तलाव कोरडे पडले आहेत. येथे पाणी टंचाई असून, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. चौदा तलावांत मृत पाणीसाठा आहे. यामध्ये जत, तासगाव, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील तलावांचा समावेश आहे. २५ टक्के पाणीसाठा १५ तलावात, तर २७ तलावांमध्ये ५० टक्के पाणीसाठा आहे. बावीस तलावांमध्ये ७५ टक्के पाणीसाठा आहे. मिरज तालुक्यातील भोसे आणि जत तालुक्यातील बिरनाळ तलावात ७५ टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा आहे.
गेल्यावर्षी २७ एप्रिल रोजी जिल्ह्यात केवळ नऊ टक्केच पाणीसाठा होता. त्या तुलनेत यावर्षी चौपट म्हणजेच ३४ टक्के पाणीसाठा आहे. मान्सून आणि परतीचा पाऊस चांगला झाल्यामुळे जिल्ह्यात सध्या तरी पाणीसाठा चांगला आहे. जत, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ आणि आटपाडी तालुक्यातील काही गावांमध्ये मात्र पाणी टंचाई आहे.
जिल्ह्यातील पाणीसाठा (दशलक्ष घन फूट)तालुका : तलाव संख्या, सध्याचा पाणीसाठातासगाव. ७ : ३५२.४०खानापूर ८ : ३३८.६०कडेगाव ७ : ३८५. ९०शिराळा ५ : ४३२. ९८आटपाडी १३ : ८७२. ९०जत. २८ : ८५५. ६२कवठेमहांकाळ ११ : ५३२. ७३मिरज ३ : ७४. ६९वाळवा २ : १४. ६०एकूण ८४ : ३८६०. ४१