सांगली : जिल्ह्यातील कोरोनाचा कहर सुरुच असून आज, बुधवारी दिवसभरात तब्बल ३५५ बाधित आढळून आले. दोन दिवसांत साडे सहाशेहून अधिक रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण सांगली, मिरज शहरात आढळत आहेत. बुधवारी सांगलीत ६८ तर मिरजेत ७५ रुग्ण आढळून आले. तालुक्यामध्ये सर्वाधिक ५१ रुग्ण तासगाव तालुक्यात आढळले. सर्वच तालुक्यात कोरोनाबाधित सापडत आहेत.आटपाडीत १७, जतमध्ये १२, कडेगावमध्ये ८, कवठेमहांकाळला २१, खानापूरला २३, मिरज तालुक्यात ३४, पलूस तालुक्यात ४, शिराळ्यात १७, वाळवा तालुक्यात २५ रुग्ण आढळले. महापालिका क्षेत्रातच १४३ म्हणजे ४० टक्के रुग्ण आढळले आहेत. सध्या उपचाराखालील रुग्णांची संख्या १२६२ इतकी असली तरी त्यातील ११८९ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. रुग्णालयात दाखल बाधितांची संख्या सध्या कमी आहे. मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील कोविड रुग्णालयात ५४ तर मिरजेच्या सिनर्जी रुग्णालयात १९ असे एकूण ७३ रुग्ण उपचार घेत आहेत.
सांगली जिल्ह्यात दिवसांत ३५५ कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 7:12 PM