याबाबत तासगाव पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कैलास देशमाने यांचा कवठेएकंद येथे होलसेल खाद्यतेलाचा व्यापार आहे. या व्यापारासाठी पुण्यातील प्रशांत पवार आणि राहुरी एमआयडीसीतील श्री अंबिका ऑइल इंडस्ट्रीजचा संचालक अजय आसाराम शेजल या दोघांनी कमी दराने खाद्यतेल पुरवठा करण्याचे आमिष दाखवले. दहा किलो सोयाबीन तेलाचा दर १३९० रुपयांना असल्याचे सांगून त्या दोघांनी देशमाने यांना विश्वासात घेतले. पैसे मिळताच तेल देण्याचे आमिष दाखवून ३६ लाख ४० हजार रुपये खात्यावर पाठविण्यास सांगितले.
पैसे पाठवल्यानंतर या दोघांनी तेलाचा पुरवठा न करता टोलवाटोलव केली. पैसे परत देण्यास नकार दिला. याबाबत देशमाने यांनी तासगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली. फिर्याद दाखल झाल्यानंतर तासगाव पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवली आणि २४ तासांत दोन्ही आरोपींना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार अधिक तपास करत आहेत.