शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

जिल्ह्यातील ३९ लाख टन उसाचे गाळप; ४१.६७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

By अशोक डोंबाळे | Published: December 31, 2022 7:19 PM

पाच कारखान्यांचे गळीत हंगाम बंदच

सांगली : जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांपैकी १३ साखर कारखान्यांचे गळीत हंगाम जोमात सुरू आहेत. पाच कारखान्यांच्या व्यवस्थापनाने अनेक प्रयत्न करूनही त्यांना या वर्षाचेही गळीत हंगाम चालू करता आले नाहीतच. १३ कारखान्याने आतापर्यंत ३८ लाख ९४ हजार ५३० टन उसाचे गाळप करून ४१ लाख ६७ हजार ५०४ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

आटपाडी तालुक्यातील माणगंगा, कवठेमहांकाळचा महांकाली, भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचे तासगाव आणि नागेवाडी, पृथ्वीराज देशमुख यांचा केन ॲग्रो हे पाच कारखाने या वर्षीही गळीत हंगाम चालू करू शकले नाहीत. उर्वरित १३ साखर कारखान्यांचे मात्र जोमात गळीत हंगाम सुरू झाले आहेत. ५० टक्केपर्यंत उसाचे गाळप करण्यात कारखाने यशस्वी झाले आहेत. पण, अनेक कारखाने सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातून ऊस गाळपास आणत आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस शेतातच राहिला आहे. काही शेतकऱ्यांच्या उसाला तर १३ ते १४ महिने होऊनही गाळपास गेला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. याकडेही साखर कारखानदारांनी लक्ष देण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील कारखान्यांकडील उसाचे गाळप

कारखाना                         ऊस गाळप (टन) साखर क्विंटल उतारा

राजारामबापू (साखराळे) ३७६१४५             ३९५५०० १०.६३राजारामबापू (वाटेगाव) २३९९८०             २८३५०० ११.९०

राजारामबापू (कारंदवाडी) १७९१०५             २१५३५० १२.०९राजारामबापू (जत)            १६८९९५             १७८१७० १०.५५

हुतात्मा (वाळवा)             २१७६१०             २०७०७५ १०.८५मोहनराव शिंदे (म्हैसाळ) २२६५००             २४३४०० १०.८८

क्रांती (कुंडल)             ४०५१३०             ४२८९०० १०.७५सोनहिरा (वांगी)             ३९३५२०             ४४९६०० ११.५७

वसंतदादा (दत्त इंडिया) ५२९८३८             ५४९५३० १०.३८उदगिरी शुगर (बामणी) २७०५५०             २९२८५० १०.९५

विश्वास (चिखली)            २९८५५०             ३४३०५० ११.६१श्री श्री शुगर (राजेवाडी) ३५१५२७             ३०७८२९ ८.८८

दालमिया (करंगुली) २३८०८०             २७४७५० ११.५४

चौदा महिने होऊनही उसाला तोड नाही

शेतकऱ्यांनी उसाची लागवण करून १३ ते १४ महिने होऊनही साखर कारखान्यांकडून वेळेत तोडी मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अनेक ठिकाणी उसाला तुरे आले असून वजनही घटणार असल्यामुळे शेतकरी ऊस तोडी मिळविण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाकडे फेऱ्या मारत आहेत.

गाळपात दत्त इंडिया, उताऱ्यात राजारामबापूची आघाडी

सांगलीतील वसंतदादा-दत्त इंडिया कारखान्याने आतापर्यंत ५ लाख २९ हजार ८३८ टन उसाचे गाळप करून ५ लाख ४९ हजार ५३० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा १०.३८ टक्केच आहे. राजारामबापू कारखान्याच्या कारंदवाडी युनिटने १ लाख ७९ हजार १०५ टन उसाचे गाळप करून २ लाख १५ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा १२.०९ टक्के घेऊन आघाडी घेतली आहे.

टॅग्स :Sangliसांगली