शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-गोवा महामार्गाची गडकरींनी दिली नवी तारीख; म्हणाले, सर्व खटले मिटले...
2
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, कॉलही करणार; MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले?
3
५५ हजारांवर येण्याचं स्वप्न भंगलं; एका दिवसात सोन्याच्या दरात १३०० रुपयांपेक्षा अधिक वाढ, नवे दर काय?
4
पुण्यातील १२ रुग्णालये नावालाच 'धर्मादाय'; नियम पायदळी तुडवले, उपचारावरून गरिबांना लुटले
5
IPL 2025 मध्ये फिक्सिंगचा प्रयत्न सुरू, खेळाडूंच्या कुटुंबीयांना केलं जातंय टार्गेट, मास्टरमाइंड कोण?
6
"आज आम्ही भोगतोय, वेळ बदलेल तेव्हा…’’ EDच्या चौकशीला हजर झालेल्या रॉबर्ट वाड्रांचं सूचक विधान   
7
"मुर्शिदाबादचा हिंसाचार सुनियोजित कट, घुसखोरांना का येऊ दिलं गेलं?"; ममतांचा सवाल
8
धमाल! आता WhatsApp वर तुम्ही ठेवू शकता मोठं स्टेटस; १ मिनिटाची लिमिट कितीने वाढवली?
9
डीअर क्रिकेट, गिव्ह मी वन मोअर चान्स! क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या करुण नायरची गोष्ट
10
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' स्टॉक, झुनझुनवालांकडे आहेत १३ कोटींपेक्षा अधिक शेअर; किंमत ₹९५ पेक्षा कमी 
11
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीपासून ॐकार साधना सुरू करा आणि अगणित लाभ मिळवा!
12
१०० कोटींची ऑर्डर! "१२०० फूट खोल खाणीत...", मुलीला शेवटचा मेसेज, लक्ष्मण शिंदेंची अपहरण करून हत्या
13
तुम्हाला श्रीमंत बनवणाऱ्या SIP चे १० सीक्रेट; कोट्यधीश होण्याचे गणित समजून घ्या
14
दीड लाखाचे व्याज माफ, म्हाडाचा निकाल; बिल्डरने आकारलेली वाढीव रक्कम रद्द करण्याची सूचना
15
"ड्रग्सच्या नशेत त्याने माझ्या ड्रेसला...", २९ वर्षीय अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप; म्हणाली...
16
'हा' शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग, महिन्याभरात अर्धी झाली किंमत; आता SEBI ची मोठी कारवाई
17
IPL 2025: 'असंभव....'; चहलच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीनंतर RJ महावशची इन्स्टा स्टोरी अन् खास मेसेज 
18
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, डिलीव्हरीच्या आदल्या दिवशी केलं फोटोशूट; जपानी भाषेत ठेवलं नाव
19
‘हनी ट्रॅप’पासून सावध राहा; गौरव पाटील प्रकरणात उच्च न्यायालयाचा इशारा
20
सतत जांभई येणं सामान्य गोष्ट नाही; मोठ्या आजाराचे असू शकतात संकेत, कसा टाळाल धोका?

Sangli Crime: बनावट सोने गहाण ठेवून बँकेची ४ लाखांची फसवणूक, कर्जदारासह तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 13:25 IST

सांगली : तुंग (ता. मिरज) येथील आयसीआयसीआय बँकेत नकली सोने गहाण ठेवून बँकेची ४ लाख ६ हजार ९८६ रूपयांची ...

सांगली : तुंग (ता. मिरज) येथील आयसीआयसीआय बँकेत नकली सोने गहाण ठेवून बँकेची ४ लाख ६ हजार ९८६ रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कर्जदार नौशाद शेखर जमादार (रा. तुंग) आणि नकली सोन्याबाबत खरे प्रमाणपत्र देणारे नेमीनाथ धनपाल गलाडगे (रा. जैन बस्तीजवळ, कसबे डिग्रज), जगदीश आदिनाथ पाटील (रा. बागणी) या तिघांवर सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.तुंग येथील आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक नानासाहेब किसन सरक (रा. तुंग, मूळ रा. नांदल, ता. फलटण) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नौशाद जमादार याने दि. १४ डिसेंबर २०२२ रोजी आयसीआयसीआय बँकेत ३५ ग्रॅम सोन्याची साखळी तारण म्हणून गहाण ठेवत १ लाख २२ हजार ५८५ रूपये कर्ज घेतले. त्यानंतर दि. १९ डिसेंबर २०२२ रोजी पुन्हा जमादार याने आणखी दोन सोनसाखळ्या गहाण ठेवल्या. त्या २९.९० ग्रॅम आणि ३२.८० ग्रॅम वजनाच्या होत्या. या दोन सोनसाखळ्या गहाण ठेवल्यानंतर त्याने २ लाख २३ हजार ८६ रूपये कर्ज घेतले.दि. १७ रोजी बँकेचे लेखापरीक्षण झाले. त्यावेळी बँकेत गहाण असलेल्या सर्व सोन्याची तपासणी झाली. त्यावेळी सोनार शीतल शहा यांनी जमादार याने ठेवलेले सोने शून्य कॅरेटचे म्हणजेच खोटे असल्याचे सांगून तसे प्रमाणपत्र दिले. चौकशीत जमादार याने सोन्याचे मूल्यांकन करणारे नेमीनाथ गलाडगे, जगदीश पाटील यांच्याशी संगनमत करून सोने खरे असल्याचे प्रमाणपत्र मिळवले. ते बँकेत सादर करून एकूण ३ लाख ४५ हजार ८८६ रूपये कर्ज व त्यावरील व्याज ६१ हजार १०० रूपये अशी बँकेची ४ लाख ६ हजार ९८६ रूपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे तिघांवर गुन्हा दाखल केला.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीbankबँकGoldसोनंCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस