शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

६५ हजार हेक्टर शेतीला दणका--अतिवृष्टीमुळे १८ हजार हेक्टरवरील पिके कुजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 6:59 PM

खरिपाची पिके हातातून गेली आणि रब्बीच्या पेरण्या करताच आल्या नाहीत, अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकला आहे. रब्बीच्या ज्वारी, हरभरा, गहू आदी पेरण्या आता कोठे सुरू झाल्यात. ७०५ पैकी तब्बल ५७३ गावे अवकाळीच्या फेºयात अडकली. सव्वा लाख शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसला.

ठळक मुद्देआॅक्टोबरच्या पावसाने सर्वाधिक हानी केल्याचे स्पष्ट झाले आहे. अजूनही ११ हजार २०७ हेक्टरचे पंचनामे व्हायचे आहेत.खानापूर तालुक्यातील शेतकºयांसाठी खरीप हंगाम महत्त्वाचा समजला जातो. त्यामुळे येथील शेतकºयांनी जून महिन्याच्या अखेरीस खरीप पेरण्या पूर्ण केल्या होत्या.

संतोष भिसे ।सांगली : सलग चार महिने कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या कृषीक्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. बागायत शेतीची दशकभराची पिछेहाट झाली असून, शेकडो एकर द्राक्षबागा यंदा सोडून द्याव्या लागल्या आहेत. शासनयंत्रणा प्रत्यक्ष मदतीऐवजी अद्याप पंचनाम्यातच गुंतली आहे. विशेष म्हणजे तब्बल लाखभर शेतकऱ्यांचा पीकविमाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

खरिपाची पिके हातातून गेली आणि रब्बीच्या पेरण्या करताच आल्या नाहीत, अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकला आहे. रब्बीच्या ज्वारी, हरभरा, गहू आदी पेरण्या आता कोठे सुरू झाल्यात. ७०५ पैकी तब्बल ५७३ गावे अवकाळीच्या फेºयात अडकली. सव्वा लाख शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसला. पंचनामे अजूनही सुरूच आहे.

अतिवृष्टीमुळे १८ हजार हेक्टरवरील पिके कुजलीविटा : गेल्या दोन ते तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीचा खानापूर तालुक्यातील शेतकºयांना मोठा फटका बसला असून, परतीच्या पावसाने हाता-तोंडाला आलेली  सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्रातील    पिके कुजली आहेत. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका खरीप ज्वारीला बसला असून, १३ हजार हेक्टर क्षेत्रातील खरीप ज्वारी पूर्णपणे वाया गेल्याने शेतकºयांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

खानापूर तालुक्यातील शेतकºयांसाठी खरीप हंगाम महत्त्वाचा समजला जातो. त्यामुळे येथील शेतकºयांनी जून महिन्याच्या अखेरीस खरीप पेरण्या पूर्ण केल्या होत्या.   परंतु, आॅगस्ट महिन्यापासून पावसाने हाहाकार उडविला. या महिन्यात पोषक ठरलेला पाऊस नंतरच्या दोन महिन्यात मात्र बंद झाला नाही. त्यामुळे खरीप ज्वारी, सोयाबीन, द्राक्षबागा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

  • या अतिवृष्टीमुळे खानापूर तालुक्यातील १४ हजार ४५१ शेतकºयांची १२ हजार ९८३ हेक्टर क्षेत्रातील खरीप ज्वारी कुजून गेली आहे. पाऊस बंद झाला नसल्याने ज्वारीची कणसे उगवून ज्वारी काळी पडली आहे, तर सुमारे ३ हजार ७९ हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील १ हजार ६४२ बाधित शेतकºयांच्या १ हजार १८० हेक्टर क्षेत्रातील भाजीपालाही परतीच्या पावसाने नष्ट झाला आहे. तसेच १ हजार ७९८ शेतकºयांच्या ९८४ हेक्टर क्षेत्रातील फळपिकेही पावसाने वाया गेली आहेत.

 

  • सव्वा लाख शेतकºयांनी ३ लाख ७७ हजार ११९ हेक्टर पेरण्या केल्या होत्या; त्यापैकी ६५ हजार २६७ हेक्टर शेतीचे कंबरडे पावसाने मोडले. पाऊस थांबताच पंचनामे सुरू झाले. आजवर ९५ हजार ८८१ शेतकºयांच्या ५४ हजार हेक्टर शेतीचे पंचनामे पूर्ण झालेत. आॅक्टोबरच्या पावसाने सर्वाधिक हानी केल्याचे स्पष्ट झाले आहे. अजूनही ११ हजार २०७ हेक्टरचे पंचनामे व्हायचे आहेत. 
टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीfloodपूर