शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

Sangli Flood: अतिवृष्टी, पुरामुळे ४,१३१ हेक्टर बाधित, शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 5:49 PM

प्रशासनाकडून पंचनामे सुरू

सांगली : मागील आठवड्यात झालेली अतिवृष्टी आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील आठ हजार ५४४ शेतकऱ्यांचे चार हजार १३१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये फळपिक, ऊस, सोयाबीन, भुईमुग, भातासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुराचा शेतकऱ्यांना कोट्यवधीचा फटका बसला आहे.कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात सलग अतिवृष्टी सुरूच राहिल्याने धरणातून पाणी सोडले. कृष्णा आणि वारणा काठावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील चार हजार १३१ हेक्टरहून अधिक शेती पाण्याखाली गेली आहे. शेतीमधील ऊस, केळी, हळद, सोयाबीन आदी पिकांत पावसाचे पाणी साचून राहिले आहे. याचा शेतकरी वर्गाला फार मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पिकविलेल्या पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. वारणा नदीकाठच्या शिराळा तालुक्यातील सर्वाधिक पिके पाण्याखाली गेली आहेत. तीस गावातील पाच हजार ३७८ शेतकऱ्यांचे दोन हजार ९१८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा नजरअंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. वाळवा तालुक्यातील एक हजार ६०६ हेक्टर आणि मिरज तालुक्यातील कृष्णा आणि वारणा काठावरील एक हजार ५६० हेक्टरवरील शेतीपिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक फटका हा ऊस, केळी, हळद आदी पिकांना बसला आहे. यंदा शेतकऱ्यांनी आडसाली उसाची लावण मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र संततधार पावसाचा मोठा फटका या कोवळ्या आडसाली उसाला बसला आहे. अनेक ठिकाणी पुन्हा उसाची लागण करावी लागणार आहे. उसाप्रमाणेच हळदीच्या पिकालाही फटका बसला आहे. नदीकाठी हळद पावसाच्या पाण्यात बुडाली आहे. भाजीपाला, टोमॅटो, काढता येत नसल्याने लाखो रुपयांची पीक शेतातच कुजली आहेत. नुकसानीची पाहणी करून त्याचे पंचनामे त्वरित करावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

तीन तालुक्यांना सर्वाधिक फटकातालुका - बाधित शेतकरी - गाव - क्षेत्र (हेक्टर)मिरज - १५६० - २१ - ६६७वाळवा - १६०६ - २८ - ५४६शिराळा - ५३७८ - ३० - २९१८एकूण - ८५४४ - ७९ - ४१३१.०५

प्रशासनाकडून पंचनामे सुरूराज्य शासनाने अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या पिकासह घरांची पडझडाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी दिली.

या पिकांचे सर्वाधिक नुकसानमिरज, वाळवा, शिराळा तालुक्यातील सोयाबीन, भाजीपाला, भूईमूग, ऊस, भात, मका, हळद, पपई, केळी, पेरू या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

टॅग्स :SangliसांगलीfloodपूरFarmerशेतकरी