सांगली : सांगलीबाजार समित्यांसाठी शुक्रवारी सकाळपासूनच मोठ्या चुरशीने मतदान सुरु आहे. १८ जागांसाठी ९० उमेदवार रिंगणात आहेत. दुपारी २ वाजेपर्यंत ८०.८१ टक्के मतदान झाले आहे. जत, कवठेमहांकाळ, मिरज आणि सांगली येथील मतदान केंद्रावर महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. मतदान केंद्रावरील गर्दी पाहून प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.सांगली, मिरज, कवठेमहांकाळ व जत येथील २४ मतदान केंद्रावर सकाळी ८ वाजलेपासून मतदानास सुरुवात झाली आहे. दुपारी २ वाजेपर्यंत ८०.८१ टक्के मतदान झाले आहे. सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी-आडते, हमाल-तोलाईदार आदींचे आठ हजार ६३५ मतदार आहे. यापैकी दुपारी २ वाजेपर्यंत सात हजार ९ मतदान झाले आहे.प्रत्येक मतदार केंद्रावर मतदारांचीही गर्दी दिसत आहे. निवडणूक चुरशीने झाल्यामुळे सर्व पक्षांनी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरात प्रयत्न केले आहेत. इस्लामपूर, विटा बाजार समितीसाठीही शांततेत मतदान सध्या सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सांगली बाजार समितीचे झालेले मतदानमतदान प्रकार झालेले मतदान टक्केवारीसोसायटी गट २४०३ ८५.१८ग्रामपंचायत २१९१ ८६.०२अडते व व्यापारी ९५८ ६२.६१हमाल व तोलाईदार १४५७ ८२.०८एकूण ७००९ ८०. ८१