शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
9
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
10
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
11
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
12
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
13
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
14
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
15
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
16
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
17
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
18
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
19
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
20
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला

पाण्यासाठी ४३ गावांचा टाहो...

By admin | Published: March 13, 2017 10:59 PM

तासगाव-कवठेमहांकाळवर पाणी संकट : प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद

अर्जुन कर्पे -- कवठेमहांकाळ --सुमारे १३ कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी महावितरणने प्रादेशिक योजनेचे पाचव्या मैलावरील जलशुद्धीकरण केंद्र आणि भिलवडी स्टेशन येथील जॅकवेलचा विद्युतपुरवठा शु्क्रवारी खंडित केला. यामुळे तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्याची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद झाली आहे. दोन तालुक्यातील ४३ गावातील लोकांना कुणी पाणी देता का पाणी, अशी मागणी करत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे.प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या मणेराजुरी प्रादेशिक योजना, कवठेमहांकाळ-विसापूर प्रादेशिक योजना आणि येळावी प्रादेशिक योजनेद्वारे तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील ४३ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गेल्या पंधरा वर्षापासून केला जात आहे. यामध्ये मणेराजुरी प्रादेशिक योजनेत १८ गावे, कवठेमहांकाळ-विसापूर प्रादेशिक योजनेत १६ गावे आणि येळावी प्रादेशिक योजनेत नऊ गावांचा समावेश आहे.४३ गावांकडून जमा होणाऱ्या पाणीपट्टीची रक्कम १ कोटी ५0 लाख रुपये आहे; तर योजना चालविण्यासाठी येणारे वीजबिल, कामगार पगार व देखभाल दुरुस्ती यावर होणारा खर्च ४ कोटी २0 लाख एवढा आहे. यामुळे योजना चालू ठेवण्यासाठी दरवर्षी जवळपास २ कोटी ७५ लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद करावी लागत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणी बंद होणे आता नवीन राहिले नाही. गेल्या वर्षभरापासून अशीच परिस्थीती राहिली आहे. अकरा महिन्यांपैकी तीन महिनेच ही योजना चालू आहे. उर्वरित आठ महिने पाणीपुरवठा बंदच आहे. शुक्रवारी परत एकदा महावितरणने पाचव्या मैलावरील जलशुद्धीकरण केंद्र आणि भिलवडी स्टेशन येथील जॅकवेलचा विद्युतपुरवठा खंडीत केला. यामुळे दोन्ही तालुक्यातील ४३ गावातील पिण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा बंद झाला आहे.प्रादेशिक  योजनेचा पाणीपुरवठा बंद झालेली गावे मणेराजुरी प्रादेशिक योजना- मणेराजुरी, योगेवाडी, धुळगाव, भैरववाडी, चिंचणी,उपळावी, कुमठे, सावर्डे, खुसगाव, कौलगे, वाघापूर, बस्तवडे, डोर्ली, पुणदी, बलगवडे, लोढे, मतकुणकी,नागाव (कवठे) येळावी प्रादेशिक योजना -येळावी, नेहरूनगर, निमणी, नागाव, बेंद्री,भिलवडी स्टेशन हजारवाडी,बुरुंगवाडी, जुळेवाडी. कवठेमहांकाळ-विसापूर प्रादेशिक योजना -कवठेमहांकाळ, शेळकेवाडी, आगळगाव,जाखापूर, जाधववाडी, शिरढोण, लांडगेवाडी, मळणगाव, जायगव्हाण, देशिंग, विठूरायाचीवाडीविसापूर, तुरची, ढवळी, गोटेवाडी, वंजारवाडी.