अशोक डोंबाळे -- सांगली --जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड-दोन महिने झाले असून, १७ लाख ८८ हजार ७८७ टन उसाचे गाळप झाले आहे. या उसाचे ४३९ कोटी ७५ लाख ७४ हजार ४० रुपयांचे बिल साखर कारखानदारांकडे थकित आहे. शासनाने एफआरपीचा तोडगा काढला नसल्याचे कारण देऊन शेतकऱ्यांना आतापर्यंत एक रूपयाही दिलेला नाही.जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम २१ आॅक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधित सुरू झाला. त्याला जवळपास दीड ते दोन महिने झाले आहेत. वसंतदादा कारखान्याने सर्वाधिक दोन लाख १९ हजार ७७० टन उसाचे गाळप केले आहे. या कारखान्याकडे चालू हंगामातील ५० कोटी ५४ लाख ७१ हजारांचे बिल थकित आहे. राजारामबापू, विश्वास, क्रांती, हुतात्मा साखर कारखान्यांचेही प्रत्येकी ३० ते ५० कोटींचे बिल थकित आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी ऊस उत्पादकांना एक रुपयाचेही बिल दिलेले नाही. जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांची ४३९ कोटी रूपयांची बिले थकित आहेत. याबद्दल शासन, संघटना आणि कारखानदार एक शब्दही बोलण्यास तयार नाहीत. कारखानदार मात्र साखरेचे दर स्थिर नसल्यामुळे आणि एफआरपीविषयी शासनाने भूमिका स्पष्ट केली नसल्याने बिल दिले नसल्याचे सांगत आहेत. साखर कारखानदार, शासन आणि संघटनांच्या संघर्षात जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. राज्य सरकारनेही एफआरपीच्या प्रश्नावर त्वरित तोडगा काढण्याची गरज होती. परंतु, सरकार साखर कारखानदार आणि ऊस उत्पादकांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याची तक्रार आहे. सध्या लग्नसराई सुरू असून, घरातील लग्नकार्यासाठी खर्चाला पैसे नसल्यामुळे शेतकरी सावकारांकडून कर्ज घेत आहेत. अनेक शेतकरी कारखानदारांचे उंबरे झिजवत असूनही बिल जमा होत नसल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडील थकित रक्कमकारखाना (मे. टन) ऊस गाळपउतारा टक्के थकित रक्कमवसंतदादा२१९७७०९.६४५०५४७१०००राजारामबापू (साखराळे)११९७२०११.७१३१८६९४६४०विश्वासराव नाईक१५५९५०१०.२०३९६४२४९००हुतात्मा१६४९८५११.५५४२७९६१०००माणगंगा १६३७०८.३०३४३७७०००महांकाली५६५६०९.७८१३००८८०००राजारामबापू (वाटेगाव)११९०९५११.३०३०९६४७०००डफळे८१८४०९.९२१८८२३२०००सोनहिरा१५२८६२११.४४३८२१५५०००क्रांती२०२५६०११.२४५०६४०००००सर्वोदय९८३८०११.६३२४५९५००००मोहनराव शिंदे८८९३०१०.९६२१३४३२०००केन अॅग्रो९२०५०१०.२६२११७१५०००उदगिरी शुगर१०३४१०११.२२२५८५२५०००सदगुरु श्री श्री शुगर११६३०५१०.०९२६७५०१५००एकूण१७८८७८७१०.७८४३९७५७४०४०
कारखान्यांकडे ४३९ कोटी अडकले
By admin | Published: December 11, 2015 10:45 PM