शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
4
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
5
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
6
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
7
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
8
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
9
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
10
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
11
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
12
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
13
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
14
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
15
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
16
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
17
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
18
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग
19
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
20
'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका

सांगली जिल्ह्यात ‘स्मार्ट पीएचसी’च्या ४४ कामांना ठेकेदारांमुळे ब्रेक, अपूर्ण कामांमुळे रुग्णांचे हाल 

By अशोक डोंबाळे | Published: September 21, 2023 5:42 PM

जिल्हा परिषद कारवाई करणार

अशोक डोंबाळेसांगली : प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सेवा आणि सुविधांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषदेने ४७ आरोग्य केंद्रांचा स्मार्ट पीएचसीमधून विकास सुरू आहे. जानेवारीत काम सुरू करण्याचे आदेश देऊनही ४४ ठेकेदारांनी कामे ठप्प ठेवली आहेत. ठेकेदारांच्या या कारभारामुळे आरोग्य केंद्रात रुग्णांच्या उपचारासाठी जागा नसल्यामुळे त्यांचे हाल होत आहे. म्हणून जिल्हा परिषदेने कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारावर बुधवारी कारवाईचा निर्णय घेतला आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपचारांसाठी आधार आहे. म्हणून तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्मार्ट पीएसी ही योजना राबविली होती. या योजनेसाठी ६४ आरोग्य केंद्रापैकी ४७ आरोग्य केंद्राची निवड केली. या आरोग्य केंद्रातील मूलभूत सुविधांसाठी २७ काेटी रुपयांच्या निधीची तरतूदही केली आहे. जून २०२२ मध्ये ४७ कामांना प्रशासकीय मजुरी दिली होती. ठेकेदारांना कामे सुरू करण्याचे आदेश जानेवारी २०२३ मध्ये दिले आहेत. स्मार्ट पीएसीची कामे सुरू होऊन साडेआठ महिने झाले आहेत. तरीही कामे पूर्ण होत नसल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे सध्या हाल चालू आहे. ४७ स्मार्ट पीएसी पैकी वायफळे (ता. तासगाव), लेंगरे (ता. खानापूर) आणि बोरगाव (ता. वाळवा) येथील कामे पूर्ण आहेत. उर्वरित ४४ आरोग्य केंद्राची कामे थांबल्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बुधवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी रखडलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त करतानाच अधिकाऱ्यांना ठेकेदारावर कारवाईच्या सूचना दिल्या.अशी आहेत स्मार्ट पीएचसीआरोग्य केंद्राची अत्याधुनिक इमारत असेल. यामध्ये शस्त्रक्रीया विभाग, बाह्यरुग्ण, अंतररुग्ण विभाग, प्रयोगशाळा, औषध निर्माण, प्रसुती, लसीकरण विभाग स्वतंत्र केले आहेत. रुग्ण समुपदेशन हाॅल, आशा, आरोग्य सेविकांसाठी अत्याधुनिक काॅन्फरन्स हाॅल आहे.आठ स्मार्ट पीएचसी कामे पूर्णत: ठप्पदिघंची (ता. आटपाडी), भोसे (ता. मिरज), संख (ता. जत) सह आठ स्मार्ट पीएसींच्या नूतनीकरणाचे काम पूर्णत: ठप्प झाले आहे. याबद्दल संबंधित ठेकेदारांना कारवाईच्या नोटिसा बजावण्यात येणार आहेत, असेही जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले.

कार्यकारी अभियंता, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पूर्णता ठप्प असलेल्या स्मार्ट पीएचसीच्या कामांची पाहणी करण्याची सूचना दिली आहे. तसेच अपूर्ण कामे ठेवणाऱ्या ठेकेदारांची लवकरच बैठक घेऊन स्मार्ट पीएचसीच्या कामांना गती देण्यात येणार आहे. - तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

टॅग्स :SangliसांगलीHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलzpजिल्हा परिषद