सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोन दिवसांपासून अकराशेवर स्थिर असली तरी मृत्यूची संख्या वाढतच आहे. रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील ३३ जणांसह परजिल्ह्यातील १३ अशा ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ११५० जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. ७४९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाची दहशत कायम असून बाधितांची संख्या कायम आहे. महापालिका क्षेत्रात सर्वाधिक २६० रुग्ण सापडले आहेत. तर मिरज तालुक्यात १६६, आटपाडी १२१ आणि तासगाव तालुक्यात ११० रुग्ण आढळले आहेत. मृतांमध्ये सांगली १, मिरज ४, कुपवाड २, तासगाव तालुक्यातील ५, खानापूर ७, आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ, पलूस,शिराळा आणि वाळवा तालुक्यात प्रत्येकी २ तर जत आणि मिरज तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ११ हजार ३७८ रुग्णांपैकी १८१८ जणांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. यातील १६५१ जण ऑक्सिजनवर तर १६७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
रविवारी प्रशासनाच्या वतीने २६०० जणांची आरटीपीसीआर अंतर्गत नमुन्यांची तपासणी केली. त्यात ८११ जण बाधित आढळले आहेत. तर रॅपिड ॲन्टिजेनच्या २१४२ जणांपैकी ४४१ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
परजिल्ह्यातील १३ जणांचा मृत्यू झाला असून १०२ नवे रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यात सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ३६ जणांचा समावेश आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ६९१९१
उपचार घेत असलेले ११३७८
कोरोनामुक्त झालेले ५५७१०
आतापर्यंतचे एकूण मृत्यू २१०३
रविवारी दिवसभरात
सांगली १८६
मिरज ७४
मिरज तालुका १६६
खानापूर १४३
आटपाडी १२१
तासगाव ११०
जत १०४
कवठेमहांकाळ ७१
कडेगाव ६७
वाळवा ६८
शिराळा २३
पलूस १७