शिराळा : शिराळा तालुक्यात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी ४७ नवीन काेराेनाबाधित रुग्ण आढळून आले. रविवारी ४६ तर साेमवारी ४७ रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील काेराेनाची स्थिती गंभीर बनली आहे. यामध्ये सांगाव हे गाव हॉटस्पॉट बनले आहे.
मंगळवारी दिवसभरात एकूण १३२ चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये निगडी येथे ९, मणदूर येथे ५, मांगले व झळकेवाडी येथे प्रत्येकी ४, आंबेवाडी, कांदे येथे प्रत्येकी ३, मांगरुळ, शिराळा, टाकवे, मादळगाव येथे प्रत्येकी २, सांगाव, ढोलेवाडी, रिळे, बेलेवाडी, पणुंब्रे वारूण, आटूगडेवाडी, कोकरूड, कोतोली, पेठ, मरळनाथपूर, वाडीचरण येथे प्रत्येकी १, असे ४७ रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यात २२८ रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये मिरज कोविड रुग्णालयात १, शिराळा कोविड सेंटर येथे ८ शिराळा कोविड रुग्णालयात ११, खासगी रुग्णालयात १, तर होम आयसोलेशनमध्ये २०७ रुग्ण उपचार घेत आहेत. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.