सांगली : कोदे (ता. गगनबावडा) येथे जमीन खरेदी करून देण्याच्या आमिषाने एकास ४८ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी राजेंद्रप्रसाद गणपतराव जगदाळे (रा. पंढरपूर रोड, मिरज) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये दिलीप बाळकृष्ण नलवडे (रा. शंभरफुटी रोड, सांगली), विलास लखू कांबळे (रा. साखरी, ता. गगनबावडा), भिकाजी यशवंत पाटील (रा. तळे, ता. गगनबावडा), आनंदा राऊ पाटील, रखमाजी राणोजी पाटील, कृष्णात राणोजी पाटील, मारूती राणोजी पाटील, काशिनाथ सादू पाटील, नानूबाई शिवराम धाग, धोंडीराम शिवराम धाग, राजाराम शिवराम धाग, राजाराम शिवराम धाग, मारूती संतू माेहिते, ममताजी नागू पाटील, महादेव सदू माळी, सखाराम म्हाकू जानकर, ठकू धाकलू जानकर, राजाराम शिवराम धाग व सरदार दादू कोटकर (सर्व रा. कोदे, ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत.२०१४ ते जुलै २०२० पर्यंत शहरातील कर्नाळ चौकीजवळील जानकी बिल्डिंग व शंभरफुटी रस्त्यावरील रॉयल आर्केड या इमारतीमध्ये असलेल्या कार्यालयात हा प्रकार घडला.फिर्यादी राजेंद्रप्रसाद जगदाळे व त्यांच्या मित्राकडून संशयितांनी कोदे बुद्रुक येथील जमीन व्यवहारापोटी ४८ लाख ६० हजार रुपयांची रक्कम घेतली होती. संशयित दिलीप नलवडे याच्या कर्नाळ पोलिस चौकीजवळ असलेल्या व रॉयल आर्केड येथील कार्यालयात रोख स्वरूपात तर काही रक्कम बँकेत ऑनलाइन पद्धतीने स्वीकारली होती. पैसे घेऊनही व्यवहार पूर्ण केला नाहीकोल्हापूर जिल्ह्यातील संशयितांनी यातील रक्कम कोल्हापुरात स्वीकारूनही त्यांनी जमीन व्यवहार पूर्ण केला नव्हता. याबाबत त्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही संशयिताकडून प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर जगदाळे यांनी शहर पोलिसांत सर्व संशयितांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
जमीन खरेदीच्या व्यवहारात ४८ लाखांची फसवणूक; सांगली, कोल्हापुरातील १८ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 12:36 PM