सांगली : सौरऊर्जा वापराकडे ग्राहकांचा कल दिवसेंदिवस वाढतो आहे. सांगली जिल्ह्यातील २ हजार ९५५ ग्राहकांनी रुफ टॉप सौर यंत्रणेद्वारे एप्रिल २०२४ या महिन्यात ४८ लाख युनिट सौरऊर्जा निर्मिती केली आहे. या योजनेतून रुफ टॉप सौर यंत्रणा बसविलेल्या ग्राहकांना वीज १०० टक्के माफ आहे. तसेच शासनाकडूनही ७८ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे.केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घरगुती ग्राहकांना तीन किलोवॅट क्षमतेच्या रुफ टॉप सौर यंत्रणेसाठी ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान आहे. पहिल्या दोन किलोवॅट पर्यंत प्रती किलोवॅट ३० हजार अनुदान आहे. ग्राहकांनी रुफ टॉप सौर यंत्रणेद्वारे विजेची निर्मिती करून वापरणे व गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यास ग्राहकास वीजबिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते.जिल्ह्यात ५३ घरगुती ग्राहकांनी लाभ घेऊन अनुक्रमे १ हजार ८० किलोवॅट व २०० किलोवॅट क्षमतेची रूफ टॉप सौर यंत्रणा बसविली आहे. जिल्ह्यात १ लाख १४ हजार ५०० घरगुती ग्राहकांकडे रूफ टॉप सौर यंत्रणा बसविण्याचे लक्ष्य आहे. यापूर्वीच्या एमएनआरई टप्पा २ योजनेत जिल्ह्यातील ३३२ घरगुती ग्राहकांनी लाभ घेऊन अनक्रमे दोन ८३० किलोवॅट व एक १५० किलोवॅट क्षमतेची रूफ टॉप सौर यंत्रणा बसविली आहे.
जिल्ह्यात रोज ४३.८३ मेगावॅट वीज निर्मितीजिल्ह्यात विनाअनुदानित व अनुदानित तत्वावर दोन ९५५ ग्राहकांनी ४३.८३ मेगावॅट क्षमतेची रूफ टॉप सौर यंत्रणा बसविली आहे. त्यात घरगुती १ हजार ८०४), वाणिज्य ४९५, औद्योगिक १७८, सार्वजनिक सेवा ३२४ ग्राहकांचा समावेश आहे.
जिल्ह्यात महिनानिहाय विजनिर्मितीमहिन -वीज निर्मिती युनिटफेब्रुवारी : ४१७८०००मार्च : ४६२२०००एप्रिल : ४८२५०००मे : ४७९००००