३९ ग्रामपंचायतींच्या १४५ प्रभागातील ३९१ सदस्य निवडण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी गुरुवारी पाच गावांतून १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सुटी होती. सोमवारी ८४ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. मंगळवारी मात्र अर्ज दाखल करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. दिवसभरात ३९४ जणांचे ४०० उमेदवारी अर्ज दाखल झाले. कवठेएकंद गावातून ५० आणि मांजर्डे येथून ४८ अर्ज दाखल झाले.
निवडणूक लागलेल्या ३९ पैकी आळते, बोरगाव, कौलगे, लोढे, मोराळे (पेड), विजयनगर आणि डोंगरसोनी या सात गावांतून अद्याप एक सुध्दा उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. दरम्यान, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
चौकट :
मंगळवारअखेर दाखल झालेले गावनिहाय अर्ज...
दहीवडी (१८), धामणी (७), ढवळी (३), धोंडेवाडी (९), धुळगाव (२१), डोर्ली (२), गव्हाण (२६), गोटेवाडी (२६), गौरगाव (११), हातनोली (२१), हातनूर (२५), जरंडी (१९), जुळेवाडी (१२), कवठेएकंद (६०), लोकरेवाडी (५), मांजर्डे (५३), नागाव (क) (५), नरसेवाडी (७), निंबळक (६), पाडळी (६), पेड (३१), राजापूर (१४), सावळज (३३), सिध्देवाडी (६), शिरगाव (वि.) (५), तुरची (११), वज्रचौंडे (२), विसापूर (६), वडगाव (८), वाघापूर (२), यमगरवाडी (१६), येळावी (२१).