शरद जाधव ।सांगली : पर्यटनासाठी परदेशात सफर करण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या पासपोर्टधारकसांगलीकरांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या साडेतीन वर्षात ५० हजार ७२६ सांगलीकरांनी पासपोर्ट काढला आहे.अनेकजण पर्यटनासाठी हमखास परदेश वारीचे नियोजन करत असतात. पर्यटन कंपन्यांकडून मिळणाºया आॅफर्स व इतरही कारणांनी गेल्या काही वर्षांपासून परदेशात जाणाºया सांगलीकरांच्या संख्येत वाढ झाली आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले व नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेलेल्या तरूणांचे प्रमाण अधिक होते. आता मात्र, केवळ हौस म्हणून नव्हे, तर गरज म्हणूनही पासपोर्ट काढले जात आहेत. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट अनिवार्य असल्याने अनेकजण तो काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
केंद्र सरकारने गेल्यावर्षीच सांगलीत पासपोर्ट सुविधा केंद्राचीही स्थापना केली आहे. त्याचाही फायदा होताना दिसत आहे. पूर्वी पासपोर्ट काढण्याची प्रक्रियाही किचकट व वेळकाढूपणाची होती. त्यामुळे अनेकांना इच्छा असतानाही पासपोर्ट काढता येत नव्हता. आता कागदपत्रांतील सुलभता, पोलीस पडताळणीतील अडचणी दूर केल्याने व अपॉर्इंटमेंटवर पासपोर्ट काढला जात असल्याने पैसा व वेळेचीही बचत होत आहे.
परदेशवारी म्हणजे केवळ उच्चभ्रूंसाठीच असल्याचा भ्रमही आता कमी होत आहे. जिल्ह्यातील अनेक तरूण, तरूणी शिक्षणासाठी परदेशात जात आहेत. परदेशातील शिक्षणासाठी बॅँकांनीही मदतीचा हात दिल्याने जगभरातील नामवंत विद्यापीठांमध्ये जिल्ह्यातील तरूण शिक्षण घेत आहे. शिक्षणाबरोबरच नोकरीसाठी अनेकजण परदेशाला पसंती देतात. विशेषत: आखाती देशांमध्ये नोकरीला प्राधान्य दिले जाते. काही वर्षापूर्वी मुंबई, पुणे अथवा देशातील एखाद्या मोठ्या शहरात नोकरीसाठी जाणारे, आता थेट परदेशाला पसंती देत असल्याने पासपोर्टला मागणी वाढली आहे.
जिल्ह्यातील उपक्रमशील शेतकरी कृषी अभ्यासासाठीही दौरे काढत असतात. शिवाय सांगली, मिरजेची ओळख असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर्सही परदेशात जात आहेत.वर्षातून एकदा पर्यटनासाठी परदेशात जाणाऱ्यांचीही संख्या वाढत असल्याने सांगलीकरांना खºयाअर्थाने परदेश वारीचे वेध लागले असल्याचे दिसत आहे.सधन तालुक्यांची भरारीपासपोर्टच्या संख्येचा विचार केला, तर जिल्ह्यातील सधन तालुक्यांतून सर्वाधिक पासपोर्ट काढले जात आहेत. सांगली, मिरज, वाळवा, पलूस या भागातून पासपोर्ट काढणाºयांची संख्या अधिक आहे. इतर भागातूनही तुलनेने अधिक नागरिक पासपोर्टसाठी अर्ज दाखल करत आहेत.
सक्षम ओळखपत्र म्हणूनही पर्यायपरदेशात जाण्यासाठीच पासपोर्ट काढण्यात यावा, हा समज दूर होत असून सक्षम ओळखीचा पुरावा म्हणूनही अनेकजण पासपोर्ट काढून ठेवत आहेत. अनेकांचे परदेशात जायचे नियोजन नसतानाही, केवळ एक महत्त्वाचा ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्टकडे पाहिले जात असल्यानेही पासपोर्ट काढला जात आहे.पासपोर्टधारकवर्ष संख्या२०१६ १०८७४२०१७ १५११८२०१८ १७६५१मे २०१९ अखेर ७११०एकूण ५०७२६