वारणावती : शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरण परिसरात एक जूनपासून आजपर्यंत ५०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या गेल्या तीन दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू आहे. त्यामुळे धरणातील विसर्गही कमी केला आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून २०२४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. गेल्या चोवीस तासांत ७ मिलिमीटर पावसासह एकूण ५०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा १८.१६ टीएमसी असून, त्यांची टक्केवारी शंभर टक्के ५२.७९ अशी आहे. पाणी पातळी ६०७.८० मीटर झाली आहे. धरणातील विसर्ग १६०० वरून ८१० क्युसेक असा कमी केला आहे. पावसाने उघडीप दिल्याने काही ठिकाणी भात कोळपणीची कामे सुरू आहेत.