सांगली : जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. १४९९ जागांसाठी निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या बुधवारी शेवटच्यादिवशी ३२२७ उमेदवारांनी ३३६३ अर्ज दाखल केले. अखेरच्या दिवसापर्यंत ५१९३ उमेदवारांनी ५३५१ अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी तहसील कार्यालयात मोठी गर्दी होती.
निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. बुधवारी आयोगाने वेळ वाढवून देत सायंकाळी साडेपाचपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुभा दिली होती. तालुक्याच्या ठिकाणी गर्दी होती. ४ जानेवारीपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया राबविताना विशेष खबरदारी घेतली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन व मास्कच्या वापरासह निवडणूक कामकाजात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेण्यात येत आहे. (सविस्तर वृत्त : हॅलो सांगलीत)
माेठ्या ग्रामपंचायती
जिल्ह्यातील माेठ्या ग्रामपंचायती असलेल्या आरग, म्हैसाळ, एरंडोली, विसापूर, भिलवडी, विसापूर, कवठेपिरान, कवलापूर, कर्नाळ, येळावी, सावळज या गावांत निवडणुकीचे वातावरण तापले आहे.