सांगली : भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचे पोलिस विभागासह अनेक शासकीय कार्यालयात उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी मानव अधिकार विकल्प संघटनेकडे प्राप्त झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षात संघटनेकडे जिल्ह्यातून साडेतीन हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये ६० तक्रारी पोलिस विभागाविरुद्ध आहेत. अन्य ४० टक्के तक्रारी शासकीय रुग्णालय, महापालिका, जिल्हा परिषद, आरटीओ कार्यालयातील आहेत. संघटनेकडून या तक्रारींचा पाठपुरावा झाल्याने सर्वांना न्याय मिळाला आहे.लोकांनी तक्रारी कराव्यातराज्य घटनेने जो अधिकार दिला आहे, त्याचे जर कुठे उल्लंघन होत असेल, तर नागरिकांनी मानव अधिकारी संघटनेकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिमन्यू अपराध यांनी केले आहे. ते म्हणाले, संघटनेचे वखारभागमध्ये कार्यालय आहे. महिन्याला साठ ते सत्तर तक्रारी दाखल होतात. या तक्रारींचा संघटनेकडून पाठपुरावा करण्यास कोणतीही कसर सोडली जात नाही. तरीही अनेक लोक निमूटपणे अन्याय सहन करतात. पण त्यांनी तसे न करता तक्रार करण्यास पुढे आले पाहिजे. लोकांनी तक्रारी कराव्यातराज्य घटनेने जो अधिकार दिला आहे, त्याचे जर कुठे उल्लंघन होत असेल, तर नागरिकांनी मानव अधिकारी संघटनेकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिमन्यू अपराध यांनी केले आहे. ते म्हणाले, संघटनेचे वखारभागमध्ये कार्यालय आहे. महिन्याला साठ ते सत्तर तक्रारी दाखल होतात. या तक्रारींचा संघटनेकडून पाठपुरावा करण्यास कोणतीही कसर सोडली जात नाही. तरीही अनेक लोक निमूटपणे अन्याय सहन करतात. पण त्यांनी तसे न करता तक्रार करण्यास पुढे आले पाहिजे.
जिल्ह्यात पोलिसांविरुद्ध सर्वाधिक ६० टक्के तक्रारी
By admin | Published: October 18, 2016 11:14 PM