मोहित्यांचे वडगाव येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन सरपंच विजय मोहिते यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी रानकवी सु. धों. मोहिते, प्रा. रोहित मोहिते, बाळासाहेब मोहिते उपस्थित होते.
विटा : मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव) येथील स्वातंत्र्यसैनिक व सागरेश्वर अभयारण्याचे जनक वृक्षमित्र धों. म. मोहिते (अण्णा) यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त व कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित शिबिरात ६३ जणांनी रक्तदान केले.
सरपंच विजय मोहिते, अभियंता शशिकांत पाटील, रानकवी सु. धों. मोहिते, प्रगतशील शेतकरी बाळासाहेब मोहिते यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. युवा नेते दिग्विजय कदम यांनी शिबिरास भेट दिली. आयोजक रोहित मोहिते यांनी, वृक्षमित्र धों. म. मोहिते अण्णांच्या जयंतीनिमित्त गेल्या सहा वर्षांपासून शिबिराचे आयोजन करत असल्याचे सांगितले.
यावेळी रक्तदात्यांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. संयोजन प्रा. रोहित मोहिते, अभिनव साळुंखे यांनी केले. यावेळी विठ्ठल मोहिते उपस्थित होते.