सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार कायम आहे. मंगळवारी नवे ६३२ रुग्ण आढळून आले, तर ८३७ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
मंगळवारी महापालिका क्षेत्रात १२६ रुग्ण आढळून आले. त्यात सांगलीत १०५, मिरजेत २१ रुग्णांचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यात ३७, जत ३०, कडेगाव ८५, कवठेमहांकाळ ४५, खानापूर ६२, मिरज ६८, पलूस ५०, शिराळा ७, तासगाव ५८, वाळवा ६४; तर जिल्ह्याबाहेरील सोलापूर, कोल्हापूर, कर्नाटकातील १५ रुग्णही उपचारासाठी दाखल झाले आहेत.
दिवसभरात जिल्ह्यातील २३ जणांचा मृत्यू झाला. त्यात आटपाडी, जत, मिरज तालुक्यातील प्रत्येकी २, कवठेमहांकाळ, पलूस प्रत्येकी एक, तासगाव ३, वाळवा तालुक्यातील ४ तर महापालिका क्षेत्रात सांगलीत ४, मिरज ३ व कुपवाडमधील एका रुग्णांचा समावेश आहे. सध्या ८२८ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आरटीपीसीआरच्या ३११६ चाचण्यांत १९० पाॅझिटिव्ह, तर अँटिजनच्या ६९७९ चाचण्यांत ४५७ रुग्ण सापडले.
चौकट
आतापर्यंतचे बाधित : १,८१९२०
कोरोनामुक्त झालेले : १,७०६७८
आतापर्यंतचे मृत्यू : ४,७९५
चौकट
मंगळवारी दिवसभरात...
सांगली : १०५
मिरज : २१
आटपाडी : ३७
जत : ३०
कडेगाव : ८५
कवठेमहांकाळ : ४५
खानापूर : ६२
मिरज : ६८
पलूस : ५०
शिराळा : ०७
तासगाव : ५८
वाळवा : ६४