शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
2
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
3
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
4
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
6
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
7
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड
8
शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका
9
"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट
10
'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..."
11
कौतुकास्पद! देशातील पहिले डिजिटल शिक्षणाचे ऑनलाईन पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
12
अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका! ट्रम्प चीनवर लादणार २४५% कर, झटक्यात १००% वाढ
13
बॉबी देओलने खरेदी केली शानदार रेंज रोव्हर SUV, किंमत आहे कोटींच्या घरात, जाणून घ्या
14
“मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही”; राज-एकनाथ शिंदे भेटीवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले
15
मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral
16
“सोनिया गांधी-राहुल गांधींवरील ED कारवाई सुडबुद्धीने, काँग्रेस डगमगणार नाही”: चेन्नीथला
17
गुरुवारी लक्ष्मी नारायण त्रिकोण योग: ९ राशींना घवघवीत यश, भरघोस लाभ; ऐश्वर्य, वैभव प्राप्ती!
18
IPL 2025: बुमराह पाठोपाठ आणखी एक गोलंदाज फिटनेस टेस्टमध्ये पास; झाला संघात सामील
19
Sharvari Wagh : "गेल्या ५ वर्षात मी दररोज नापास होत होते..."; अभिनेत्री शर्वरी वाघने केला रिजेक्शनचा सामना
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार आदर्श पत्नी कोण? वाचा 'हा' श्लोक आणि जाणून घ्या लक्षणं!

सांगली जिल्ह्यात ६६६ कोटी कर्ज थकीत, जिल्हा बँकेकडून वसुलीची विशेष मोहीम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 19:26 IST

सांगली : जिल्ह्यातील विकास सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना दिलेल्या पीक कर्ज वाटपापैकी ५९ हजार कर्जदारांकडे चक्क ६६६ कोटी रुपये थकीत आहेत. ...

सांगली : जिल्ह्यातील विकास सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना दिलेल्या पीक कर्ज वाटपापैकी ५९ हजार कर्जदारांकडे चक्क ६६६ कोटी रुपये थकीत आहेत. या थकबाकीदारांविरोधात जिल्हा बँकेने विशेष मोहीम राबवली आहे. या प्रयत्नातून आतापर्यंत ४८ कोटी रुपये वसूल झाले आहेत. ३१ मार्चअखेर बहुतांशी थकबाकी वसुलीचे जिल्हा बँक प्रशासनाचे प्रयत्न असणार आहेत.जिल्हा बँकेने गेल्या वर्षभरापासून थकबाकी वसुलीसाठी कठोर मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये बड्या थकबाकीदारांवरही कारवाई करून वसुलीला प्राधान्य दिले जात आहे. जिल्हा बँक स्वत: थेट कर्जवाटप करत आहे. या कर्जाच्या थकबाकी वसुलीसाठी बँकेकडून लगेच कारवाई केली जात आहे. पण, जिल्ह्यातील विकास सोसायट्यांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या कर्ज वसुलीला अनेक अडथळे निर्माण होत आहेत. विकास सोसायट्यांच्या माध्यमातून दिलेल्या कर्जापैकी ५९ हजार कर्जदारांनी ६६६ कोटी रुपये अद्याप भरलेले नाहीत. या कर्जदारांना कारवाईच्या वारंवार नोटीसही बजावल्या आहेत. पण शासनाने निवडणुकीत कर्जमाफीची घोषणा केली होती. शासनाकडून कर्जमाफी होईल, म्हणून अनेक कर्जदारांनी कर्जच भरले नाही. यातूनच जिल्ह्यातील ५९ हजार कर्जदारांनी ६६६ कोटी रुपये थकीत ठेवले आहेत. या कर्जदारांकडील ६० टक्के कर्ज हे मागील आर्थिक वर्षातील असून, ४० टक्के कर्ज जुने आहे. या कर्जदारांकडील कर्ज वसुलीसाठी तीन हजार शेतकऱ्यांच्या मालमत्तांचा लिलाव विकास सोसायट्यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेने सुरू केला आहे. या कारवाईमुळे आतापर्यंत ४८ कोटी रुपये वसूल झाले आहेत, अशी माहिती जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.

तीन हजार कर्जदारांवर जप्तीची कारवाईविकास सोसायट्यांमार्फत दिलेल्या पीक कर्जदारांपैकी ५९ हजार थकबाकीदार आहेत. या थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई चालू आहे. आतापर्यंत तीन हजार कर्जदारांवर जप्तीची कारवाई चालू आहे. अन्य कर्जदारांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे परवानगी मागितली आहे, असेही सीईओ शिवाजीराव वाघ म्हणाले.

जिल्हा बँकेने थकबाकी कमी करून उत्पन्न वाढवण्यास प्राधान्य दिले आहे. या आर्थिक वर्षात बँकेचा नफा २०० कोटींहून अधिक झाला पाहिजे, असे आमचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार सर्वच छोट्या-मोठ्या थकबाकीदारांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. ५९ हजार कर्जदारांकडील ५० टक्केपेक्षा जास्त थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न चालू आहेत. - शिवाजीराव वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक, सांगली

टॅग्स :SangliसांगलीbankबँकFarmerशेतकरी