शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

पाडव्याला ७0 कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:08 PM

सांगली : साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्यादिवशी (रविवारी) खरेदीचा अमाप उत्साह संपूर्ण शहरात दिसून आला. चांगला मुहूर्त आणि सुटीचा आनंद व्दिगुणीत करत विविध गोष्टींची विक्रमी खरेदी ग्राहकांकडून झाली. ७० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्याने एसी (वातानुकूलित यंत्र), कुलरना मागणी होती, तर यंदा आटाचक्की, दुचाकी वाहने व वॉटर ...

सांगली : साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्यादिवशी (रविवारी) खरेदीचा अमाप उत्साह संपूर्ण शहरात दिसून आला. चांगला मुहूर्त आणि सुटीचा आनंद व्दिगुणीत करत विविध गोष्टींची विक्रमी खरेदी ग्राहकांकडून झाली. ७० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्याने एसी (वातानुकूलित यंत्र), कुलरना मागणी होती, तर यंदा आटाचक्की, दुचाकी वाहने व वॉटर प्युरिफायरची (आरओ) चांगली विक्री झाली. सोने खरेदीसाठी सराफ बाजार फुलून गेला होता. मराठी वर्षाची सुरुवात आणि दिवाळीनंतरचा सर्वात मोठा सण म्हणून गुढीपाडव्याकडे पाहिले जाते. त्यामुळे यावर्षी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापाºयांनी वेगवेगळ्या स्कीमची रेलचेल केली होती. त्यास ग्राहकांनी प्रतिसाद देत खरेदीचा अमाप उत्साह दाखविला. त्यामुळे तब्बल ७० कोटींच्या उलाढालीची गुढी रविवारी उभारली गेली. यामध्ये सर्वाधिक उलाढाल दुचाकी आणि चारचाकी वाहने, शेतीउपयोगी वाहनांची झाली. त्याखालोखाल मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना मागणी होती. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने यावेळी कुलर आणि एसी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल दिसून आला. आटाचक्कीला चांगली मागणी होती.शहरातील विविध दुचाकी शोरूममधून मोठ्या प्रमाणावर पाडव्याच्या मुहूर्तावर वाहनांचे वितरण करण्यात आले. पंधरा दिवस अगोदर बुकिंगची प्रक्रिया सुरू होती. तीन हजारहून अधिक दुचाकींची विक्री झाली.दरवर्षीच गुढीपाडव्याला इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये कुलर आणि एसीला मागणी असते. त्याखालोखाल मोबाईलची उलाढाल झाली. मोबाईलमध्ये रॅम आणि रॉम अधिक असणारे मोबाईल आणि विशेषत: सेल्फीच्या सर्वाधिक पिक्सेलचा कॅमेरा असलेल्या मोबाईलला अधिक पसंती मिळाली. ग्राहकांचा फायनान्स योजनेकडे जादा ओढा होता.महिलांच्या औत्सुक्याचा विषय असलेल्या सोने खरेदीसाठी रविवारी चांगली गर्दी झाली होती. सध्या लग्नसराईचेही दिवस असल्याने त्यामुळेही सोने खरेदीत वाढ झाली होती. शहरातील सराफ बाजाराबरोबरच विश्रामबाग परिसरात दुकानातही मोठी गर्दी होती. ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. सराफ बाजार ते गणपती पेठ आणि कापडपेठेपर्यंत वाहतुकीची कोंडी होती. सायंकाळी उशिरापर्यंत खरेदीसाठी उत्साह दिसून आला.सोन्याची : सुवर्णझळाळीगुढीपाडव्याच्या महूर्तावर सोने खरेदीचा उत्साह दरवर्षी दिसून येतो. यंदाचा द्राक्ष व ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, त्यामुळेही शेतकरी वर्गाकडून खरेदीला प्राधान्य दिले जाते. बिले अजून मिळाली नसली तरी तडजोड करून खरेदी केली जाते. यंदा अशाच उत्साहात सांगलीच्या सराफ बाजारात पाच कोटींहून अधिक उलाढाल झाली आहे. सोन्याचे दागिने खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल दिसून आला. दिवसभर येथील सराफ बाजार व शहरातील विविध भागातील दुकानांमध्ये गर्दी दिसून आली.