शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

सांगलीत ‘ऑनलाईन बझार’चा सात हजार ग्राहकांना गंडा, कोट्यवधीचा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 4:56 PM

ग्राहकांनी ऑनलाईन पैसे भरून मालाचे बुकिंग केल्यानंतरही दोन महिने त्यांना माल पोहोच झालेला नाही.

सांगली : शहरालगतच्या एका ऑनलाईन बझारने ॲपद्वारे नोंदणी असलेल्या सुमारे सात हजार ग्राहकांना कोट्यवधीचा गंडा घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ग्राहकांनी ऑनलाईन पैसे भरून मालाचे बुकिंग केल्यानंतरही दोन महिने त्यांना माल पोहोच झालेला नाही. बझारच्या कस्टमर केअरसह अन्य संपर्क क्रमांकांवर प्रयत्न केल्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांची चिंता वाढली आहे. काहींनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.सांगली शहराजवळ काही वर्षांपूर्वी हा बझार सुरू करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी स्वत:च्या ॲपवरून नोंदणी सुरू केली. सवलतीच्या आकर्षक जाहिराती करून ग्राहकांना जाळ्यात ओढले. घरगुती ग्राहकांसह छाेट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी माल घेण्यास सुरुवात केली. काही वर्षे वेळेत व योग्यपद्धतीने मालाचा पुरवठा करणाऱ्या या बझारची सेवा गेल्या सहा महिन्यांपासून बिघडली.ॲपवरून ऑनलाईन मालाचे बुकिंग व आगाऊ पैसे भरूनही माल मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांनी कस्टमर केअरसह बझारकडे तक्रारी सुरू केल्या. तक्रारींचा ओघ वाढल्याने बझारच्या संचालकांनी संबंधित संपर्क क्रमांकावरून प्रतिसाद देणे बंद केले. विशेष म्हणजे नियम व अटींमध्ये कंपनीचे हे ॲप प्रायोगिक तत्त्वावर सुरु केले असल्याचे नमूद केले आहे.

ऑनलाईन ऑर्डर रद्दनंतरही परतावा नाही

प्राथमिक अंदाजानुसार बझारकडून पैसे भरूनही माल न मिळालेले सुमारे सात हजार लोक आहेत. यातील अनेकांना ऑनलाईन ऑर्डर रद्द करण्याची सूचना बझारने केली होती. काहींनी ऑनलाईन ऑर्डर रद्द केल्यानंतरही पैसे परत मिळाले नाहीत. ॲपच्या ग्राहक प्रतिसाद (कस्टमर रिव्ह्यू) वर ग्राहकांनी तक्रारींचा पाऊस पाडला आहे. हे ॲप व हा बझार कसा फसवा आहे, हे त्यावर मांडले आहे.

पोलिसांत एकही तक्रार नाहीदोन ते तीन हजार रुपये अडकलेल्यांची संख्या अधिक असून किरकोळ रकमेसाठी पोलिसांत कशाला जायचे, म्हणून अद्याप कोणीही तक्रार दिलेली नाही.

अडीच हजाराचा तेलाचा डबा १९९९ मध्येज्यावेळी १५ किलो खाद्यतेलाचा डबा बाजारात २५०० रुपयांना येत होता, त्यावेळी या बझारने तो १९९९ रुपयांना देण्याची जाहिरात केली होती. एप्रिलमध्ये त्यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केली. त्यामुळे एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाचे बुकिंग करण्यात आले आहे.न पटणाऱ्या ‘ऑफर’

गहू, डाळींच्या दरात प्रतिकिलो ३ ते ५ रुपयांची सवलत, अडीच हजाराच्या खरेदीवर २२ रुपये दराने ५ ते ३०० किलोपर्यंतची साखर, दहा हजार रुपयांच्या खरेदीवर दोन हजार रुपयांचा पिंप फ्री अशा सहजासहजी न पटणाऱ्या ‘ऑफर’ या बझारने दिल्या होत्या. सुरुवातीस घरपोच माल देऊन विश्वास संपादन केला होता.

टॅग्स :SangliसांगलीonlineऑनलाइनfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी