सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढली असली तरी, अद्याप बेडची उपलब्धता अधिक आहे. एक शासकीय व चार खासगी रुग्णालयांमध्ये कोविड उपचार केले जात असून, खासगीमध्येही पैसे देऊन रुग्ण दाखल होत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा शासकीय व खासगी मिळून ५० कोविड रुग्णालये उभारली होती. त्यामध्ये जवळपास ३ हजार बेड उपलब्ध केले होते. नव्या वर्षात कोरोना रुग्ण कमी झाल्यानंतर अधिग्रहीत केलेली रुग्णालये व तालुकास्तरावरील रुग्णालये बंद करण्यात आली. मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील शासकीय रुग्णालय व चार खासगी रुग्णालये अशी एकूण ५ रुग्णालयेच आता सुरु ठेवण्यात आली आहेत. गेली आठवडाभर रुग्णसंख्या वाढत आहे. आठ दिवसांत सहाशेवर रुग्ण वाढले असले, तरी रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. गृह विलगीकरणातील रुग्ण अधिक आहेत. त्यामुळे या रुग्णालयांमधील बेड सध्या मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहेत.
अशी आहे बेडसची आकडेवारी
एकूण ६५७
रिकामे ५०२
उपलब्ध ६५७
शासकीय रुग्णालय
उपलब्ध ३२८
रिकामे २३८
खासगी
उपलब्ध ३२९
रिकामे २६४
आयसीयु
एकूण २०३
शासकीय ९८
खासगी १०५
वॉर्ड
एकूण ४५४
शासकीय २३०
खासगी २२४
खासगी रुग्णालयातील (दर रुपये प्रतिदिन)
वॉर्ड ४०००
आयसीयु (व्हेन्टिलेटरशिवाय) ७५००
आयसीयु (व्हेन्टिलेटरसह) ९०००
असे आहे प्रमाण
खासगी रुग्णालयातील एकूण खाटांच्या तुलनेत १९ टक्के रुग्ण दाखल आहेत. शासकीय रुग्णालयातील एकूण बेडसपैकी २७ टक्के बेड व्यापले आहेत.
कोट
शासनाने दिलेल्या ॲनेक्श्चर सी नुसार खासगी रुग्णालयांना बिल आकारायचे आहे. त्यावर पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ऑडिट समिती नेमली आहे. अजून ती कायम आहे.
- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक, सांगली