सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढ गुरुवारीही कायम होती. दिवसभरात ७६ नवे रुग्ण आढळून येतानाच खानापूर तालुक्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ४० जण कोरोनामुक्त झाले आहेत.
बाधितांच्या संख्येतील वाढ कायम राहिल्याने प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. नागरिकांनीही विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रात १९ रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने गुरुवारी आरटीपीसीआरअंतर्गत १०७६ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. ॲण्टीजेनच्या ८४५ जणांच्या तपासणीतून २३ जण बाधित आढळले आहेत.
उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ५०० वर पोहोचली असून त्यातील ५८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात ५२ जण ऑक्सिजनवर तर ६ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यांतील प्रत्येकी एकास कोराेनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४९२३१
उपचार घेत असलेले ५००
कोरोनामुक्त झालेले ४६९६०
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७७१
गुरुवारी दिवसभरात
सांगली १३
मिरज ६
वाळवा १८
खानापूर १०
कडेगाव ८
मिरज ६
शिराळा ५
जत ४
पलूस, तासगाव प्रत्येकी २
आटपाडी १