सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती. बोंबेवाडी येथे केवळ एका जागेसाठी मतदान असल्याने तिथे सर्वात कमी मतदान झाले. तिथे केवळ १६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे सर्वात कमी मतदान झाले. लेंगरेवाडी येथे दुपारी किरकाेळ कारणावरून बाचाबाची झाली. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले. पण नंतर वाद मिटविण्यात आला. ही घटना वगळता संवेदनशील ठिकाणांसह सर्वच गावांमध्ये शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. विठलापूर येथे सशस्त्र पोलिसांचा प्रथमच मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनेक ठिकाणी कार्यकर्ते मतदारांना मतदानासाठी आग्रह करत होते.
गावनिहाय मतदानाची टक्केवारी
विठलापूर ७९.८० टक्के, घरनिकी ७४.३१, धावडवाडी ७४.२२, देशमुखवाडी ८३.७२, शेटफळे ७५.४१, बोंबेवाडी ४.७१, तळेवाडी ८७.०७, लेंगरेवाडी ८७.१६, माडगुळे ८१.०३.