शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सांगली जिल्ह्यातून घरपट्टी, पाणीपट्टीचे ७९ कोटी वसूल, विशेष मोहिमेमुळे वसुलीस गती 

By अशोक डोंबाळे | Published: April 25, 2023 6:44 PM

ग्रामपंचायत निवडणुकीचाही झाला फायदा

सांगली : जिल्ह्यातील ६९८ ग्रामपंचायतींकडून घरपट्टीचे ४७ कोटी २१ लाख आणि पाणीपट्टीचे ३२ कोटी २ लाख ५४ हजार रुपयांची वसुली झाली आहे. लोकअदालत, ग्रामपंचायतींनी विशेष मोहीम राबविल्यामुळे आणि ग्रामपंचायत निवडणुकीमुळे घरपट्टी, पाणीपट्टी वसुली चांगली झाली आहे.जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात ५५ कोटी ८० लाख ४४ हजार रुपये घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट होते. यापैकी पूर्वीची थकबाकी ७ कोटी ७५ लाख ५३ हजार आणि चालूचे ४७ कोटी ४६ लाख ३८ हजार रुपयांचा समावेश आहे. यापैकी ४७ कोटी २१ लाख रुपये वसूल झाले असून ते प्रमाण ८४.६० टक्के आहे. तसेच पाणीपट्टीचे ३७ कोटी ६२ लाख २० हजार रुपये वसुलीचे उद्दिष्ट होते. यामध्ये पूर्वीची थकबाकी ५ कोटी ६ लाख ८९ हजार, ३२ कोटी ५५ हजार ३१ हजारांचा समावेश आहे. यापैकी ३२ कोटी २ लाख ५४ हजार रुपये वसूल झाले असून ८५.१२ टक्के वसुलीचे प्रमाण आहे.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमार्फत गावपातळीवर आपापल्या कार्यक्षेत्रातील कुटुंबांकडून घरपट्टी, पाणीपट्टी व दिवाबत्ती कराची वसुली करण्यात येते. त्यानुसार दरवर्षी मार्चपर्यंत जास्त कर वसूल करण्यासाठी प्रयत्न होतात. यासाठी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात अधिकाधिक वसुली करण्यावर भर दिला जातो. यंदा मात्र याच महिन्याच्या १४ तारखेपासून सर्वच सरकारी कर्मचारी हे बेमुदत संपावर गेले होते. हा संप आठवडाभर चालल्यामुळे आणि काही सरकारी सुट्यांमुळे मार्च महिन्यातील केवळ दहा दिवस हे कर वसुलीसाठी मिळाले. याचा परिणाम हा करवसुलीवर झाला आहे. परिणामी कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आल्याचे दिसत आहे.लोकअदालतींचा करवसुलीसाठी मदत : तानाजी लोखंडेगेल्या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कराची ५५ कोटी ८० लाख ४४ हजार रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ठेवले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वर्षभरात तीन ते चार लोकअदालतींचे आयोजन केले होते. या लोकअदालतींचा फायदा हा ग्रामपंचायत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी झाल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे यांनी सांगितले.अशी झाली वसुली (रक्कम लाखात)तालुका - घरपट्टी - पाणीपट्टीवाळवा - ९०२.९१ - ६२५.३६पलूस - ४०७.६३ - ३३९.३९खानापूर - ३०५.४५ - १९८.१४तासगाव - ३६१.८२ - ३०१.०७जत - ४४२.०८ - १८०.५६मिरज - ९२१.५८ - ६४२.६५शिराळा - २८७.६० - २८६.९१कडेगाव - ३८५.२० - २१९.१०आटपाडी - ३६०.१० - २३६.७०क.महांकाळ - ३४५.९१ - १७२.६६एकूण - ४७२.१३ - २०२.५४

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायत